घरCORONA UPDATEडोंबिवलीकर करोनाबाधित तरूण हजारोंमध्ये फिरला! प्रशासनाची चिंता वाढली!

डोंबिवलीकर करोनाबाधित तरूण हजारोंमध्ये फिरला! प्रशासनाची चिंता वाढली!

Subscribe

आख्ख्या जगाला करोनाचा विळखा पडल्याचं चित्र सगळीकडे दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव जगभरातल्या अनेक देशांपासून सुरू होऊन भारतात देखील हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाविषयी जनजागृती देखील केली जात आहे. मात्र, असं असातानाही एका डोंबिवलीकर तरुणाने ती घोडचूक केलीच! परदेशातून आलेल्या प्रवाशांनी तातडीने चाचणी आणि स्क्रीनिंग करून घ्यावं, असे निर्देश सरकार वारंवार देत असताना १५ मार्च रोजी तुर्कस्थानमधून ट्रीपवरून परतलेला हा तरूण थेट घरी गेला. पण त्याहून पुढे त्यानं जे केलं, ते कल्याण-डोंबिवलीकरांच्या आणि प्रशासनाच्या देखील काळजात धडकी भरवणारं आहे!

जमावबंदीनंतरही लग्नाला १ हजार लोकांची उपस्थिती

१५ मार्चला परतलेला हा तरूण १९ मार्चला झालेल्या त्याच्या भावाच्या लग्नाला हजर होता. या लग्नाला १ हजार लोकांची उपस्थिती देखील होती. सरकारने तेव्हा ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश दिलेले असताना देखील इतक्या मोठ्या संख्येने लोकं लग्नासाठी डोंबिवलीत जमले होते हे विशेष! पण लग्नानंतर त्याला करोनाची लक्षणं आढळली. त्यामुळे त्याने स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्याला तपासून डॉक्टरांनी लागलीच त्याला कस्तुरबा हॉस्पिटलला पाठवलं. तिथे त्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल बुधवारी आला आणि त्यात त्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्याहून गंभीर बाब म्हणजे या तरुणासोबत त्याचे २१ मित्र देखील त्याच सहलीवर तुर्कस्थानात गेले होते.

- Advertisement -

पालिका प्रशासनाची तातडीने कार्यवाही

रुग्णालय प्रशासनाने लागलीच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला याची माहिती दिली. पालिका प्रशासनाने तातडीने तरूण राहात असलेल्या भागात फवारणी केली आणि त्याच्या संपर्कात आलेल्या आणि लग्नात उपस्थित राहिलेल्या, अशा सर्व लोकांना ट्रेस करायला सुरुवात केली आहे.

मूर्खांचा गोतावळा!

रुग्णालय, पालिका प्रशासन, पोलीस व्यवस्था, सरकार असे सगळेच आपापल्या परीने करोनाशी लढा देत आहेत. मात्र, यामध्ये नागरिकांनी जर अशा प्रकारे बेजबाबदारच नव्हे, तर मूर्खपणांच वर्तन केलं, तर आपलाच जीव वाचवण्यासाठी झटत असलेली यंत्रणा ताण वाढल्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यासाठी असमर्थ ठरेल हेही तितकंच खरं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत ६ करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातल्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, या एकूण ६ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे अशा प्रकारे परदेशातून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे करोनाबाधित झाले होते.


CoronaVirus- ‘घराबाहेर जाऊ नकोस’ असं सांगितलं म्हणून केली भावाची हत्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -