घरमुंबईचालत्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील तरुणीचा मृत्यू

चालत्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील तरुणीचा मृत्यू

Subscribe

दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडून एका तरुणीचा मृत्यू झाल आहे.

कोपर-दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं त्या तरुणीचं नाव आहे. लोकलमधील वाढत्या गर्दीचा हा आणखी एक बळी ठरला आहे. सविता हिने डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी जलद लोकल पकडली, यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कोपर दिवा स्थानका दरम्यानच तोल जाऊन ती खाली पडली असल्याची माहिती आहे. हा प्रकार समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. कल्याण डोंबिवली आणि ठाणे दरम्यानच्या लोकल गाड्यांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. सकाळच्यावेळी डोंबिवलीहून लोकलमध्ये चढणेही मुश्किल असते. वाढत्या गर्दीमुळेच अपघाताचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासन याकडं लक्ष्र देईल का असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

गर्दीमुळे अशा घटनांची पुनरावृत्ती

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. आता पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. चालत्या लोकलमधून खाली पडलेल्या तरुणीचा मृतदेह डोंबिवलीकडे नेला जात आहे. सध्या घटनास्थळी जीआरपीटी टीम दाखल झाले असून मृतदेह डोंबिवलीत पाठवले जात आहे. प्रचंड गर्दीमुळे गाडीत उभे राहणे देखील अवघड होते. त्यातून धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी सारखे प्रकार होण्याची दाट शक्यता असते. गर्दीमुळे अशा दुर्घटनेंची वारंवार पुनरावृत्ती होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धावत्या लोकलवर दगड आणि बॉटल फेकून मारणार्‍या तिघांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -