घरमुंबई'चांद्रयान २' खड्डे बघून चुकून डोंबिवलीत उतरले!

‘चांद्रयान २’ खड्डे बघून चुकून डोंबिवलीत उतरले!

Subscribe

सध्या डोंबिवलीतील खड्डांबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेने ऐन गणेशोत्सवात देखील खड्डे बुजविले नसल्यानि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरनंतर सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांची. कल्याण डोंबिवलीने खड्ड्यांबाबतीत चंद्रालाही मागे टाकले, अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. महापालिका हद्दीतील सर्वच रस्त्याची चाळण झाली आहे. ऐन गणेशोत्सवात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत कार्यक्रमानिमित्त आलेले हृदयनाथ मंगेशकर यांनीही डोंबिलीतील खड्ड्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

६० वर्षापूर्वी जसे डोंबिवलीत खड्डये होते तशी परिस्थिती असल्याची भावना व्यक्त करीत सत्ताधार्यांना जणू काय खडे बोल सुनावले होते. इस्रोने चंद्राऐवजी कल्याण डोंबिवलीत यान पाठवायला हवे होते. चांद्रयान आणि खड्डे अशी एकच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र यातून सत्ताधारी आणि प्रशासन ढिम्म असल्याचेच दिसून येत आहे.

- Advertisement -

खड्ड्यात दुचाकी आदळल्याने महिला जखमी

खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. प्रज्ञा रोजेकर असे त्या महिलेच नाव असून तिच्या पायाला जबर मार लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असतानाच या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. नांदिवली परिसरातील रस्त्यावर मोठं मोठं खड्डे पडले आहेत. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रोजेकर या स्कुटीवरून नांदिवली रस्त्याने जात असतानाच तेथील खड्ड्यात त्याची स्कुटी आढळल्याने त्या खाली पडल्या, त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या एका पायाचे ऑपरेशन झाले असून आता दुसऱ्या पायाला जबर मार लागला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्यात यावे अशी मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -