Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे डॉनको पकडना मुश्कीलही नही नामुमकीन है , भांडुपचा डॉन निघाला भुरटा मोबाईल...

डॉनको पकडना मुश्कीलही नही नामुमकीन है , भांडुपचा डॉन निघाला भुरटा मोबाईल चोर

खर्‍या पोलिसांना सिनेमाचा डायलॉग ऐकवणारा गजाआड

Related Story

- Advertisement -

डॉन को पकडना मुश्किलही नही, नामुमकीन है ! हा ‘डॉन’ या हिंदी चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा डायलॉग चांगलाच लोकप्रिय असल्याचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पोलिसांना हाच डायलॉग ऐकवून आव्हान देणार्‍या भांडुपच्या भुरट्या मोबाईलचोर डॉनला डोंबिवली पोलिसांनी गजाआड केले. मोबाईल चोरणार्‍या आणि स्वतःला डॉन म्हणविणार्‍या एका चोरट्याने आपल्याला पकडून दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्या भुरटा चोर असणार्‍या डॉनला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी भांडूपमधून अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिममधील कोपर भागातील एका चाळीमध्ये काही रहिवाशांच्या घरातील मोबाईल फोन अचानक चोरीला गेले होते. सर्वसाधारणपणे चाळीतील घरांचे दरवाजे दिवसभर उघडेच असतात. याच घरांना लक्ष्य करीत चोरटा चालता चालता अनेक घरातील चार्जिंगला लावलेले वा टेबल अथवा सोफ्यावर ठेवलेले मोबाईल चोरी करून पसार होत असे.

- Advertisement -

मोबाईल चोरी केल्यानंतर चोरटे मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवतात. मात्र, हा चोरटा मोबाईल स्वीच ऑफ करीत नव्हता. त्यावर कोणी कॉल केला तर मैं हूँ डॉन असे नाव सांगायचा. एव्हढेच नव्हे तर आपल्याला पकडून दाखविण्याचे आव्हान देखील देत होता. ज्यांचे मोबाईल चोरीला गेले त्यांनी याबाबत विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. विष्णूनगरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी गणेश वडणे, बी.के. सांगळे आणि पथक यांनी तांत्रिक विश्लेषणच्या मदतीने तसेच गुप्त बातमीच्या मार्फत शोध कार्य सुरू केले.

तपासादरम्यान पोलीस कर्मचारी सांगळे यांचे या मोबाईल चोरासोबत एकदा व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले. त्यावेळी त्याने ‘मै हूं डॉन’, डॉन को पकडना मुमकीन नही’ म्हणत पोलिसांनाच चॅलेंज दिले. तेव्हा त्याच्या कॉलचा तांत्रिक बाबीद्वारे शोध घेतला असता तो वाशिम येथे असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, पोलिसांनी या डॉनच्या मुसक्या आवळायच्या असे ठरविले होते. हा चोरटा भांडुप येथे चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार विष्णुनगर पोलिसांनी त्याला भांडूप येथून अटक केली. मात्र, अटक होताच स्वतःला डॉन म्हणणारा भुरटा चोर पोलिसांसमोर थरथर कापत होता.

- Advertisement -