घरठाणेडोंबिवली एमआयडीसीतील जुना जलकुंभ पाडणार, त्याजागी जास्त क्षमतेचा नवीन जलकुंभ बांधणार

डोंबिवली एमआयडीसीतील जुना जलकुंभ पाडणार, त्याजागी जास्त क्षमतेचा नवीन जलकुंभ बांधणार

Subscribe

 डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

डोंबिवली एमआयडीसी परीसरात घरडा सर्कल जवळ असलेला २५ – ३० वर्षे जुना जलकुंभ वापराभावी जीर्ण झाला होता. तो जुना जलकुंभ पाडून त्याच ठिकाणी नव्याने जास्त क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात यावा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआयडीसीकडे केली होती. खा. डॉ. शिंदे यांच्या मागणीला एमआयडीसीकडून हिरवा कंदील मिळाल्याने नवीन जलकुंभ बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डोंबिवली एमआयडीसी परीसरातील घरडा सर्कल जवळ सुमारे २० लाख लिटर क्षमतेचा पाण्याची साठवणूक करणारा जलकुंभ २० – २५ वर्षांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र तो गेली अनेक वर्षे वापरात नसल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जलकुंभाची अवस्था फार बिकट व जीर्ण झाली आहे. खासदार कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख यांनी हि बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्याबाबत चौकशी चालू केली असता डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून जलकुंभ धोकादायक असल्याने तातडीने पाडण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे सांगितले.

- Advertisement -

जलकुंभातून यापूर्वी एमआयडीसी विभाग व लगतच्या अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु तो आता पूर्णपणे बंद असल्यामुळे या परीसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचा जलकुंभ पाडून त्याच जागेवर जास्त क्षमतेचा जलकुंभ बांधल्यास पुढील अनेक वर्षे सदर भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. जास्त क्षमतेचा एक ओव्हरहेड जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ बांधण्यात यावा,अशी मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एका पत्राद्वारे केली होती. तसेच एमआयडीसीचे मुख्य अधिकारी बिपीन शर्मा यांना प्रत्यक्ष भेटून खा. डॉ. शिंदे यांनी चर्चा केली होती.त्यांच्या मागणीला यश आले असून जुना जलकुंभ निष्कासीत करून त्या जागेवर २० लाख लिटर क्षमतेचा एक ओव्हरहेड व ५० लाख क्षमतेचा एक भूमिगत जलकुंभ बांधण्याचे आदेश एमआयडीसीच्या मुख्य अधिकारी यांनी केले आहेत .त्यामुळे भविष्यात एमआयडीसी व परीसरातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -