Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईDombiwali : मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी, लॉ परीक्षेत गोंधळ

Dombiwali : मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी, लॉ परीक्षेत गोंधळ

Subscribe

सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

डोंबिवली । मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित पीएचडी आणि लॉ परीक्षा डोंबिवलीतील सुरेखा इन्फोटेक केंद्रावर १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि केंद्रावर पुरेशा सोयीसुविधांचा अभाव यामुळे परीक्षा वेळेत सुरू होऊ शकली नाही. यामुळे परीक्षेला उपस्थित असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा संयम तुटला आणि त्यांनी केंद्रावर गोंधळ घातला. सकाळी ९ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थिती लावली होती. मात्र, नियोजित वेळेपर्यंत परीक्षा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली होती. तसेच केंद्रावर शुद्ध पाण्याची, स्वच्छतागृहाची आणि इतर मूलभूत सोयींची कमतरता होती. यामुळे विद्यार्थी अधिक संतप्त झाले.

विलंबामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्रावर गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळाला आवर घालण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आले. मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी केंद्राची व्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकारामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि नैराश्य पसरले. या संपूर्ण प्रकारावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काही ठोस मागण्या केल्या आहेत. परीक्षा आयोजनासाठी नेमलेल्या एजन्सीची चौकशी करून गैरप्रकारांबाबत दंडात्मक कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने केंद्र व्यवस्थापन सुधारावे, तसेच उशिराने झालेल्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेचे फेरआयोजन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली, मुंबई विद्यापीठ प्रशासनाने या परिस्थितीवर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -