Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईDombiwali : आठवडाभरापासून बरणीत डोके अडकले 

Dombiwali : आठवडाभरापासून बरणीत डोके अडकले 

Subscribe

श्वानाची सुखरूप सुटका

डोंबिवली । डोंबिवली आणि कल्याणच्या मधोमध ग्लोब इस्टेटजवळील अमाकिंन सोसायटीच्या आवारात एका भटक्या कुत्रीची डोके प्लॅस्टिकच्या जारमध्ये अडकले होते. त्यामुळे या श्वानाची हळूहळू मरणासन्न अवस्था झाली होती. जवळपास आठ दिवस उपाशीपोटी आणि त्रस्त अवस्थेत भटकणार्‍या या कुत्रीची अखेर पॉज संस्थेच्या तत्परतेमुळे सुटका करण्यात आली. सोसायटीतील सदस्य कईद काचवाला यांनी या दुर्दैवी अवस्थेतील कुत्रीला पाहून पॉज संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी तातडीने केडीएमसीच्या श्वानपथकाला माहिती दिली. प्रमुख कैलास आणि त्यांच्या चार सहकार्‍यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जाळीच्या साहाय्याने कुत्रीला पकडले.

या कुत्रीचे नामकरण आदीशी असे करण्यात आले असून तिला सध्या केडीएमसीच्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. प्रकृती सुधारल्यानंतर नसबंदी, रेबीज लसीकरण पूर्ण करून तिला पुन्हा तिच्या परिसरात सोडण्यात येणार आहे, असे डॉ. भणगे यांनी सांगितले. पॉज संस्थेने नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आणि मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. त्रस्त प्राण्यांच्या मदतीसाठी ९८२०१६१११४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -