घरट्रेंडिंगजेव्हा ट्रम्प हिंदीत ट्विट करतात...

जेव्हा ट्रम्प हिंदीत ट्विट करतात…

Subscribe

जेव्हा ट्रम्प हिंदीत ट्विट करतात...

जेव्हा ट्रम्प हिंदीत ट्विट करतात…

भारत दौऱ्यासाठी निघालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवास करताच एक हिंदीतल ट्विट केले आहे. दोन दिवसाच्या भारत दौऱ्यात ते ३६ तास भारतात असणार आहेत. गुजरात आणि दिल्ली अशा दोन ठिकाणी ट्रम्प यांचा दौरा आहे.

- Advertisement -

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौराच्या आधीच सोशल मिडियात एक आपली नवीन क्रेझ तयार केली आहे. अगदी बाहुबलीचा व्हिडिओ शेअर करण्यापासून ते ट्रम्प यांचे अनेक मिम्सही तयार करण्यात आले आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांनीही तितक्याच आनंदाने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. भारतातल्या सोशल मिडिया युजर्सने तयार केलेल्या व्हिडिओमुळे ट्रम्प यांच्या स्वतःच्याच देशातील ट्विटर युजर्सने टीकाही केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात पहिल्यांदाच येणार आहेत. त्यांच्या स्वागतापासून मोदी सरकार जय्यत तयारी केली. ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हिडिओ चक्क डोनाल्ड ट्रम्प यांनीच शेअर केला आहे. ट्रम्प यांना बाहुबलीच्या रुपात दाखवलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ट्रम्प यांनी देखील स्वतः हा व्हिडिओ शेअर करत भारतातील माझ्या मित्राने मला पाठवला असल्याचे म्हटले आहे. मात्र या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या शिवगामीच्या रुपात दाखविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच सध्या हा व्हिडिओ ट्विटरवर दिसत नाही.

- Advertisement -

 

हम भारत आने के लिए तत्पर हैं । हम रास्ते में हैँ, कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे !

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -