घरCORONA UPDATEमाझा वाढदिवस साजरा करू नका; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र

माझा वाढदिवस साजरा करू नका; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून यंदा मात्र त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहून मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या वाढत्या मृत्यू संख्येमुळे समाजात दुःखाचे वातावरण असताना वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांची मदत करा, तिच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे 

कोरोनामुळे यंदा वेगळी परिस्थिती आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहे की, कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथेच जनतेला मदत करा, दिलासा द्या. ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. गेल्या २-३ महिन्यातील परिस्थितीत ही मन विषण्ण करणारी आहे. या कठीण प्रसंगातही महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात आहे. माझ्या सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या ऐकताना मला आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा. मी भाग्यवान आहे की, मला तुमच्या सारखे सहकारी मिळाले. कार्यकर्त्यांनी आपला स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे कार्य केले आहे, त्याला माझा सलाम आहे.

हेही वाचा –

Corona: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -