घरCORONA UPDATECovinवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता वाट पाहू नका, जवळच्या रुग्णालयात जाऊन लस घेण्याचे...

Covinवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता वाट पाहू नका, जवळच्या रुग्णालयात जाऊन लस घेण्याचे पालिकेचे आवाहन

Subscribe

जर कोविनवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर रुग्णालयात जाऊन रजिस्ट्रेशन करुन लस घेता येणार आहे.

राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. लसीकरण करण्याआधी कोविन वेबसाईट आणि कोविन App वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्हाला लसीची तारिख देण्यात येते त्या दिवशी जाऊन लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागते. मात्र आता असे करावे लागणार नाही. कोविनवर लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर नागरिकांना लसीकरणाची तारिख मिळेपर्यंत वाट पहावी लागणार नाही. तुमच्या जवळच्या रुग्णालयात थेट जाऊन तुम्हाला लस घेता येणार आहे. त्याचप्रमाणे जर कोविनवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर रुग्णालयात जाऊन रजिस्ट्रेशन करुन लस घेता येणार आहे. कोरोना संकेत स्थळावर यशस्वी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लोकांनी प्रतिक्षा न करता जवळच्या रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

- Advertisement -

कोरोनावर प्रभावी असणारी कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर पात्र नागरिकांना लस घेता यावी यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने एकूण ५९ खासगी रुग्णालयात २५० रुपये दराने सशुल्क लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. ज्या लोकांनी कोविन वेबसाईटवर कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन केले नाहीय त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन तिथेच त्या क्षणी लस घेता येणार आहे. हे लसीकरण महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण केल्यास ते मोफत असणार आहे. मात्र जर खासगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण केल्यास २५० रुपये मोजावे लागणार आहेत.

शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनावर काही खात्रीशीर औषध नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग,मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे त्याचबरोबर वारंवार हात धुणे या गोष्टींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -