घरमुंबईचिंता नको, बेस्टकडे 3 हजार 337 बसगाड्या राहणारच! BMC आयुक्तांचे आश्वासन

चिंता नको, बेस्टकडे 3 हजार 337 बसगाड्या राहणारच! BMC आयुक्तांचे आश्वासन

Subscribe

बेस्ट उपक्रम हा कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात सुरू आहे. बेस्टला तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी बेस्ट उपक्रमात कंत्राटी तत्वावर भाडे कराराने इलेक्ट्रिक, एसी खासगी बसगाड्या घेण्यात आल्या आहेत.

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या बस ताफ्यात पूर्वीप्रमाणेच 3,337 स्वमालकीच्या बसगाड्या कायम ठेवण्यासाठी तातडीने निधीची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहे, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील माजी नगरसेवक व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, अनिल पाटणकर, अनिल कोकीळ यांनी केला आहे. (Dont worry BEST will have 3 thousand 337 buses! Assurance of BMC Commissioner)

बेस्ट उपक्रम हा कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात सुरू आहे. बेस्टला तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी बेस्ट उपक्रमात कंत्राटी तत्वावर भाडे कराराने इलेक्ट्रिक, एसी खासगी बसगाड्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा कमीकमी होऊ लागला आहे. याची गंभीर दखल गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रमात सत्तेत राहिलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागातील स्वमालकीचा 3,337 बसगाड्यांचा ताफा कायम ठेवणे व त्यासाठी मुंबई महापालिकेकडून निधीची पुर्तता करण्यात यावी, अशी मागणी केली.

- Advertisement -

हेही वाचा : फळ पिकांच्या स्वयंचलित ठिबकसाठी आता मिळणार ‘एवढे’ अनुदान; केंद्राने दाखवला हिरवा झेंडा

सध्या बेस्टकडे 1 हजार 686 बसगाड्या शिल्लक

सध्या बेस्ट उपक्रमाकडे बस ताफ्यात स्वमालकीच्या फक्त 1 हजार 686 बसगाड्या आहेत. जुन 2019 मध्ये मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या दालनात झालेल्या कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या 3 हजार 337 बसगाड्यांचा ताफा कायम ठेवून त्यावरील बसगाड्या कंत्राटी असतील असे ठरले होते. मात्र बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या बसगाड्या 1 हजार 686 इतक्याच शिल्लक राहिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : MLA Disqualification : ठाकरे गटाचे प्रतोद प्रभूंची उलट तपासणी; अवघड प्रश्नांना दिले सोपे उत्तरं

2025 नंतर सर्वच बसगाड्या निघणार भंगारात

2025 नंतर बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्या या मुदत संपत असल्याने नियमाने त्या बसगाड्या भंगारात निघणार आहेत. परिणामी बेस्ट उपक्रमात स्वमालकीची एकही बस शिल्लक राहणार नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून सदर गंभीर विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे आणि स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याबाबत राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांना तातडीने आदेश देण्याबाबत सूचना केलेली आहे. त्या अनुषंगाने बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष उमेश सारंग, मनोहर जुन्नरे, गणेश शिंदे यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना लिखित निवेदन देण्यात आले. या चर्चेत आयुक्त यांनी बेस्टच्या मालकीचा ताफा 3 हजार 337 कायम ठेवण्यासाठी निधीची पूर्तता करण्यात येईल. त्याबाबत राज्य शासन आणि केंद्र सरकारला सुद्धा विनंती करण्यात येईल, असे सांगितले. आणि लवकरात लवकर बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस घेण्याबाबत तत्वता मान्यता दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -