घरमुंबईदाराला कुलूप अन् पोलिसांची नोटीस; जामीन मंजूर झाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी गायब

दाराला कुलूप अन् पोलिसांची नोटीस; जामीन मंजूर झाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी गायब

Subscribe

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील महत्त्वाची आरोपी अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) हिला सोमवारी (२७ मार्च) न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ती गायब झाली आहे. अनिक्षा राहत असलेल्या घराला कुलुप असून दारावर पोलिसांनी नोटीस लावली आहे. त्यामुळे अनिक्षा कुठे गेली याची चर्चा सुरू झाली आहे.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अनिक्षा जयसिघांनी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी अनिक्षाला जामीन मंजूर झाला असून तिच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या गुन्ह्यात अनिल जयसिंघानी प्रमुख आरोपी असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला.

- Advertisement -

अनिक्षाला जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी तिची भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली असून ती डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून रवाना झाली. मात्र जेलमधून बाहेर पडल्यानंतर अनिक्षाने माध्यमांसोर न येण्यासाठी उल्हासनगर येथील तिच्या घरी टाळले असून अज्ञातस्थळी गेल्याचे समजते. तिच्या घराला कुलुप असून दारावर अनिल जयसिंघानीच्या नावाने पोलिसांची नोटीस लावलेली आहे.

हेही वाचा – भाजप बदला घेण्याचे राजकरण करतंय; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देणे, ब्लॅकमेलिंग करणे याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी आरोपी आहेत. १६ मार्च रोजी अनिक्षा जयसिंघानीला क्राइम ब्रांच पोलिसांनी तिच्या घरातून आणि अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांनी मागितली ट्रान्झिट रिमांड
अनिल जयसिंघानी याच्यावर मध्य प्रदेशात आणखी एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुंबई कोर्टातून अनिल जयसिंघानी याची ट्रान्झिट रिमांड मागितली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होईल, तर अनिल जयसिंघानी याच्या जामीन अर्जावर ३१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. अनिल जयसिंघानी याच्यासोबत पकडलेला आणखी एक सहआरोपी निर्मल जयसिंघानी हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -