घरमुंबईकामोठेत पूर्व वैमनस्यातून दिराने केली वहिनी - पुतण्याची हत्या

कामोठेत पूर्व वैमनस्यातून दिराने केली वहिनी – पुतण्याची हत्या

Subscribe

महापालिका हद्दीमधील हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील जुन्या रागाचा बदला घेण्याच्या उद्देशाने दिराने आपल्या वहिनीचा तसेच दोन वर्षाच्या पुतण्याची निर्घृण हत्या केली आहेत. वहिनी आणि चिमुकल्याच्या डोक्यात जड वस्तू घालून हा खून केल्याची घटना काल, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कामोठेमधील सेक्टर ३४ मधील एकदंत सोसायटीमध्ये घडली. याबाबतची तक्रार योगेश चव्हाण यांनी पोलिसांत दिल्यानंतर आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना 

योगेश दिनकर चव्हाण (वय २८) हे आपली पत्नी जयश्री (वय २२) आणि मुलगा अविनाश (वय २) यांच्यासह कामोठे सेक्टर ३४ मधील एकदंत को. ऑप. हा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर राहत होते. यावेळी योगेश याचा मोठा भाऊ सुरेश दिनकर चव्हाण (वय ३०) हा त्यांच्यासोबत राहत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी योगेश यांनी आपला भाऊ सुरेश याला घरी राहण्यास मनाई करून घरातून बाहेर काढले होते. सोमवारी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत जुना राग मनात ठेवून सुरेश याने आपली वहिनी जयश्री हिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार केल्यामुळे जड वस्तू डोक्यात घालून जयश्री हिच्या खून केला. यावेळी तो तेवढ्यावरच न थांबता जयश्री हिचा २ वर्षाचा मुलगा अविनाश याच्यावरही त्याने राग काढत त्यालाही जीवे मारले. या प्रकारानंतर आरोपी सुरेश चव्हाण हा घरातच बसून राहिला. रात्री ११ वाजता जयश्रीचा पती योगेश हा आपले काम आटपून घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे त्याने कामोठे पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी घटनास्थळी पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडला असता आतमध्ये दोन्ही मायलेकांचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. यावेळी आरोपी सुरेश चव्हाण हा देखील याचठिकाणी एका कोपऱ्यात बसलेला होता. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक करून भा. दंड. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘जुळ्या मुलांचा बळी दे, तुझ्या अडचणी दूर होतील’; अंधश्रद्धेतून शनायाचा खून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -