घरताज्या घडामोडीमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरी पार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरी पार

Subscribe

मुंबईसाठी सर्वांत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा संपूर्ण विभागांमध्ये १०० दिवसांच्या पुढे जावून पोहोचला असून रुग्ण वाढीचा सरासरी दरही निम्म्यावर अर्थात ५० टक्क्यांवर आलेला आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी ही घसरण मुंबईकरांना समाधान देणारी आहे.

मुंबईत सध्या एकूण बाधित रुग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ०८७ एवढी झाली असून त्यातील २ लाख २१ हजार ४५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या १९ हजार ०३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २७ ऑक्टोबरला मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १३९ दिवसांवर आला आहे. तर मुंबईतील महापालिकेच्या २४ विभागांमध्ये हा दर १०० दिवसांच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. परळ, लालबाग, शिवडी या महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा २९६ दिवसांचा आहे. तर त्याखालोखाल कुलाबा, नरिमन पॉईंट हा ए विभाग आहे. या ए विभागात हा कालावधी १९८ दिवसांचा आहे. तर कांदिवलीतील आर-दक्षिण विभागात हा कालावधी सर्वांत कमी म्हणजे १०५ दिवसांचा आहे.

- Advertisement -

याशिवाय रुग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन अर्धा टक्क्यांवर आला आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढ होण्याच्या प्रती १०० रुग्णांमागील दर हा जेवढा कमी असेल तेवढे सकारात्मक आणि चांगले असल्याचे द्योतक आहे. २१ ऑक्टोबर २०२० रोजी दिवस अखेरीस हा दर सरासरी ०.६९ टक्के एवढा होता. या दरात आता आणखी ‘सकारात्मक घट’ नोंदविण्यात आली असून हा दर आता सरासरी ०.५० टक्के एवढा झाला आहे. याच अनुषंगाने विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा ‘एफ दक्षिण’ विभागामध्ये ०.२३ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. या खालोखाल ‘ए’ विभागात ०.३५ टक्के आणि ‘जी दक्षिण’ विभागात ०.३७ टक्के एवढा नोंदविण्यात आला आहे. सर्व २४ विभागांपैकी १२ विभागांमधील सरासरी रुग्णवाढीचा एकूण सरासरी पेक्षा अर्थात ०.५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा एकदा सर्व मुंबईकरांचे आभार मानत लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबईत ‘मिशन झिरो’ हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महापालिकेला निश्चितपणे मिळेल, असा विश्वासही यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी..

१०० ते १२५ दिवस : ७ विभागात
१२६ ते  १५० दिवस : ६ विभागात
१५१ ते १७५   दिवस :६ विभागात
१७६ ते २०० दिवस : ४विभागात
२०१ च्या वर  दिवस :१ विभाग

रुग्ण वाढीचा सरासरी दर…

०.५०% पेक्षा कमी :  १२विभागात
०.५१ ते ०.६० % :  ०९  विभागात
०.६० % पेक्षा जास्त :  ३ विभागात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -