HomeमुंबईDevendra Fadnavis : संग्रहालये इतिहासाची आणि सभ्यतेची संस्कृतीची प्रतीके - मुख्यमंत्री

Devendra Fadnavis : संग्रहालये इतिहासाची आणि सभ्यतेची संस्कृतीची प्रतीके – मुख्यमंत्री

Subscribe

भायखळा येथील राणीच्या बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे तब्बल तीन कोटी रुपये खर्चून महापालिकेने नूतनीकरण केले आहे. या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, बुधवारी (8 जानेवारी) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची (राणी बाग) मुंबईच्या इतिहासात अग्रणी भूमिका आहे. कोणत्याही शहराची श्रीमंती ही तेथे किती श्रीमंत आहेत, तेथील इमारती, रस्ते यावर अवलंबून नसते, तर तेथील संग्रहालयावर अवलंबून असते. जगातील उत्तम शहरात उत्तम संग्रहालये असतात. त्यामुळे उत्तम संग्रहालये सभ्यतेची, इतिहासाची आणि संस्कृतीची प्रतीके असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (Dr. Bhau Daji Lad Museum in Rani Bagh inaugurated by CM Devendra Fadnavis)

भायखळा येथील राणीच्या बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे तब्बल तीन कोटी रुपये खर्चून महापालिकेने नूतनीकरण केले आहे. गेल्या 2003 पासून महापालिकेने हे संग्रहालय एका सामंजस्य कराराअन्वये ‘जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक)’ यांच्या ताब्यात सांभाळायला दिले आहे. या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, बुधवारी (8 जानेवारी) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कौशल्‍य विकास, रोजगार, उद्योजकता व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार राजहंस सिंह, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, अश्विनी जोशी, उपायुक्त चंदा जाधव (उद्यान), माजी आमदार यामिनी जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – Torres Scam : बोंबला! 200 ते 300 रुपयांना मिळणारे हिरे ‘टोरेस’मधून विकले ‘एवढ्या’ किंमतींना, घेण्यासाठी उडालेली झुंबड

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संग्रहालयाच्या माध्यमातून त्या देशाची, शहराची सभ्यता, संस्कृती, लोक जीवन आणि इतिहास कळतो. तसेच, आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे. आतापर्यंत झालेला विकास आणि त्यासाठी झालेली स्थित्यंतरे भावी पिढीला समजणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, भारत हा जगातील सर्वात जुनी संस्कृती ( मोहनजोदडो)आजही नांदत असलेला एकमेव देश आहे. आपला देश संस्कृतीची खान आहे. सिंधू सभ्यता असलेला देश आणि संस्कृती आपण जपणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. भाऊ दाजी लाड हे डॉक्टर होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते व त्यांना त्या भाषा अवगत होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी या संग्रहालयासाठी अनेक दुर्मिळ वस्तू दिल्या आणि निधी गोळा केला. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या संग्रहालयास 50 वर्षापूर्वी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. आज 50 वर्षानंतर त्यांच्या नावाचे हेच संग्रहालय नव्या रुपात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. डॉ. भाऊ दाजी लाड यांचे संग्रहालय हे महाराष्ट्रातले सर्वात जुने, तर देशातील तिसरे सर्वात जुने संग्रहालय आहे. मुंबईत भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे संग्रहालय एक आकर्षण असेल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – Dadar Railway Station : तरुणीचे केस का कापले? आरोपीने सांगितले अजब कारणमहापालिका आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?

दरम्यान, मुंबईच्या जडणघडणीत डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव आदराने घेतले जाते. युरोपातील संग्रहालयाच्या धर्तीवर तीन कोटी रुपये खर्चून डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची चार वर्षात उभारणी करण्यात आली आहे. कोविड, दुरुस्तीची कामे आदी कारणांमुळे संग्रहालय चार वर्षे बंद होते. आता नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ते जनतेसाठी आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी दिली.