घरमुंबईडॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

Subscribe

६ जुलै पर्यंत होणार रिक्त जागांवर प्रवेश

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र सरकारने राज्यात नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला दुसर्‍या मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठातील सिडनहॅम आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी ६ जुलै २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून हे प्रवेश रिक्त असलेल्या जागांवर दिले जाणार आहेत. पदवीच्या प्रथम वर्षांची ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश अर्ज भरून प्रवेश घ्यावयाचे आहेत.

एकात्मिक, कौशल्याधारित, रोजगारक्षम अभ्यासक्रमाबरोबर संशोधनाला प्राधान्य देणार्‍या डॉ. होमी भाभा विद्यापीठामध्ये 29 मेपासून प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. परंतु विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा असलेल्या या विद्यापीठातील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने सलग दोनवेळा मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

विद्यापीठातील एलफिन्स्टन कॉलेजातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएस्सी (आयटी) बीएस्सी (बायोटेक) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेशित होऊ इच्छिणार्‍या तर सिडनहॅम कॉलेजातील बीकॉम, बीएमएस, बीबीआय आणि पदव्युत्तर साठी एमकॉम (अकाऊंट अँड बँकींग अँड फायनान्स) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेशित होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी त्या-त्या कॉलेजातील प्रवेश-पुस्तिकेतील सुचनेनुसार ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घ्यायचे आहेत.

होमी विद्यापीठातील उपलब्ध जागा
एलफिन्स्टन महाविद्यालय-
बीए १२०, बीकॉम-२४०, बीएस्सी-१२०, बीएस्सी (आयटी) -६०, बीएस्सी बायोटेक-४०
सिडनहॅम महाविद्यालय-
बीकॉम-६००, बीएमएस-१२०, बीबीआय-१२०, एमकॉम (अकॉउंट, बँकिंग एण्ड फायनान्स ः २४०)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -