घरमुंबई'दीक्षित डाएट प्लॅन'ला स्थूलता नियंत्रण ब्रँड अॅम्बेसेडरचा बहुमान

‘दीक्षित डाएट प्लॅन’ला स्थूलता नियंत्रण ब्रँड अॅम्बेसेडरचा बहुमान

Subscribe

स्पेशल डाएट प्लॅनमुळे नेहमी चर्चेत असणारे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना स्थूलता नियंत्रण ब्रँड अॅम्बेसेडरचा बहुमान प्राप्त झाला आहे.

स्पेशल डाएट प्लॅनमुळे नेहमी चर्चेत असणारे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना स्थूलता नियंत्रण ब्रँड अॅम्बेसेडरचा बहुमान प्राप्त झाला आहे. राज्य सरकारने नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. शारीरिक स्वास्थ आणि त्याचे आहाराशी असलेले नाते याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धती विकसित केली आहे. डॉ. दीक्षित यांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना याबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

डॉ. दीक्षित यांची नियुक्ती

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्थुलता नियंत्रण मोहीम राबविण्यात आली. या विषयातील अनुभव आणि ज्ञान यामुळे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. स्थुलतेमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला नक्कीच होणार आहे.

- Advertisement -

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याविषयी

डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना सोमवारी नियुक्तीचं पत्र दिलं. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचारा पद्धतीने फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. तसेच सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ या नावाने देखील प्रसिद्ध आहे.


पहा – सियाराम्ससाठी कोण होते आधीपासून ब्रँड अॅम्बेसेडर

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -