Homeक्राइमGold Smuggling : मुंबई विमानतळावर पाच कोटींचे सोने जप्त; चौघांना अटक

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर पाच कोटींचे सोने जप्त; चौघांना अटक

Subscribe

सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून शुक्रवारी अटक केली. या आरोपींकडून 4 कोटी 84 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

मुंबई : सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून शुक्रवारी अटक केली. या आरोपींकडून 4 कोटी 84 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची तस्करी करण्याआधीच आरोपींना पकडण्यात आले. (dri seizes gold worth 5 crores at mumbai airport 4 smugglers arrested)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री एअर शॉपमध्ये काम करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांचा एक गट सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती संचालनालयाला (DRI) मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – Sanjay Raut About Fadnavis : फडणवीस यांचे कौतुक थांबेना, काय म्हणाले संजय राऊत?

आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट टर्मिनस येथून हे कर्मचारी तस्करांकडून सोन्याचे छोटे – छोटे तुकडे ताब्यात घेत. आणि मग ते एकत्र करून विमानतळाच्या बाहेर नेत असत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे DRI ने अशाच सोने बाहेर नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोने ताब्यात घेण्यासाठी आलेल्या दोन रिसीव्हर्सची माहिती मिळाली. त्यानंतर त्या दोघांना देखील अटक करण्यात आली.

तपास केल्यानंतर त्यांच्याकडे 5 अंडाकार कॅप्सूल, तसेच मेणात ठेवलेला सोन्याच्या चुऱ्याची 2 पाकिटे सापडली. या सोन्याचे वजन 6.05 किलो एवढे होते आणि किंमत 4.84 कोटी एवढी होती. डीआरआयने या प्रकरणी सीमा शुल्क नियम, 1962 च्या तरतुदीं अंतर्गत या चौघांना अटक केली आहे. हे सोने जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा – RRB : रेल्वेच्या ‘ग्रुप डी’मध्ये भरती, नियमांमध्ये केले मोठे बदल; वाचा –

गेल्या महिन्यातही DRI ने स्वतंत्र कारवाई केली. तेव्हा त्यांनी तस्करी करून 9.6 कोटींचे 12 किलो सोने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथून जप्त केले. हे सोने डीजे लाईट्समध्ये लपवून आणण्यात आले होते. तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दोघांना देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.