कोरोना लस टोचून घेण्याआधी किंवा नंतर ‘पेग मारल्यास’ होतील हे साईड इफेक्ट

कोरोना लस टोचून घेण्याआधी किंवा नंतर 'पेग मारल्यास' होतील हे साईड इफेक्ट

देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पण जरी तुम्ही कोरोना लस घेतली असेल किंवा घेणार असाल तरीही नंतर तुम्हांला सावध राहावे लागणार आहे. विशेषत ज्या व्यक्तींना दारू पिण्याची सवय असेल त्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या तरी आपल्या देशात कोरोना लस घेण्याआधी किंवा नंतर दारू सेवनासंदर्भात कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. पण इतर देशांमध्ये मात्र नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत.

दारुमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी कोरोना व्हायरसबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. त्यामुळे कोरोना बळावतो. यामुळेच कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतरही दारुचे सेवन करू नेय असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दरम्यान, यावर तज्ज्ञांचीही वेगवेगळी मते आहेत. गेल्या महिन्यात रशियातील तज्ज्ञांनी सांगितले की स्पुटनिक लस (Sputnik Vaccine) घेण्याच्या दोन आठवड्याआधी आणि लस घेतल्यानंतर ६ आठवड्यांपर्यंत दारुचे सेवन करू नये. कारण त्याचा थेट परिणाम कोरोना लसीवर होतो. व्हायरसबरोबर लढण्याची क्षमता कमी होते.

तर काही तज्ज्ञांच्या मते कोरोना लस घेण्याआधी जर तुम्ही मर्यादेत मद्य सेवन केले तर त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.

पण जर तुम्ही अधाशासारखी दारु प्याल तर लसीचा शरीरावर योग्य तो परिणाम होणार नाही.

तसेच फक्त दारुचं नाही तर लस घेतल्यानंतर साखरयुक्त पेय, हवाबंद डब्यातील पदार्थ, जंक फूड खाणेही टाळावे.