ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे भलतेच लाड, पालक बर्गर घेऊन NCB च्या ऑफिसबाहेर

मुलांना अटक झाली तरीही देखील पालकांनी त्यांचे लाड करण्याचे काही थांबवलेले नाही

drug case arrested accused's mother reaches NCB office with mcdonald's burger
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे भलतेच लाड, पालक बर्गर घेऊन NCB च्या ऑफिसबाहेर

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने (NCB) केलेल्या मोठ्या कारवाईनंतर अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचे नाव आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. आर्यन खानसह ८ जणांना ७ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आलीय. कोठडीत असलेले ८ही जण तरुण आहेत. मुलांच्या अटकेनंतर त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक जण मुलांना कोठडीत भेटण्यासाठी येताना त्यांचे कपडे, जेवणाचे डब्बे घेऊन येताना दिसत आहेत. मात्र आपल्या लाडक्या मुलांचे लाड करणे काही पालकांनी थांबवलेले नाही. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या एका आरोपीला भेटण्यासाठी आलेल्या एका आरोपीची आई मॅकडोनल्डचा बर्गर (mcdonald’s burger) घेऊन थेट एनसीबी ऑफिसच्या बाहेर पोहचली. मुलांना अटक झाली तरीही देखील पालकांनी त्यांचे लाड करण्याचे काही थांबवलेले नाही हे दिसून आले आहे.

आपण पाहिले तर आर्यन खान देखील या ८ जणांसोबत ७ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडीत आहे. एनसीबीच्या चौकशीत आर्यनने ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबूली दिल्यानंतर तो ठसाठसा रडला होता असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुख खान देखील मुलाच्या चिंतेने स्पेनहून आपले शुटींग अर्धवट टाकून भारतात आलाय. एनसीबीच्या चौकशीदरम्यान शाहरुख आणि आर्यनचे केवळ २ मिनीटे बोलणे होऊ शकले होते. तेव्हा आर्यनने मला यात मुद्दाम अडकवण्यात आले असल्याचे शाहरुखला सांगितले होते.

२ ऑक्टोबर रोजी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह ८ आरोपींना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी त्याचा जामीन अर्ज देखील दाखल केला होता. मात्र कोर्टाने आर्यनसह ८ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – NCBच्या चौकशीत सतत रडतोय Aryan, शाहरुख सोबत केवळ २ मिनिटं झालं बोलणं