घरमुंबईअर्नाळा किल्ल्यात दारुड्या पर्यटकांना बंदी

अर्नाळा किल्ल्यात दारुड्या पर्यटकांना बंदी

Subscribe

पर्यटनाच्या नावाखाली दारुच्या पार्ट्या करून अर्नाळा किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करणार्‍या दारुड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी दुर्गमित्र आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

दुर्ग आणि किल्ल्यांचे संवर्धन,संरक्षण करण्यासाठी दुर्गमित्रांकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत जंजीरा-अर्नाळा किल्ल्यात दारुच्या शेकडो रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.चारही बाजुने सुमद्राने वेढलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक, संशोधक येत असतात. त्यात कॉलेजच्या तरुण-तरुणींना मोठा सहभाग असतो. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच दारु आणि बिअरची विक्री केली जात असल्यामुळे पर्यटकांचे चांगलेच फावले आहे.

दसर्‍याच्या दिवशी या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात पार्ट्याही रंगल्याचे उघडकिस आले आहे.या किल्ल्यातील बुरुज जोडप्यांचा कप्पा, मद्यपींचा अड्डा आणि मुतारीचा कोपरा या नावाने ओळखू लागले आहेत.स्वच्छता मोहिमेत बाटल्यांचा खच, काचांचे तुकडे, मांसाहारी पदार्थांचे खरकटे, प्लास्टीकच्या पिशव्या, अन्नपदार्थांची आवरणे सापडल्यामुळे दुर्गमित्रांच्या भावना दुखावल्या आहेत. अर्नाळा किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी दुर्गमित्रांकडून आटापिटा केला जात असतानाच केवळ नफेखोरीसाठी मद्याची विक्री केली जात असल्यामुळे ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

वांरवार आवाहन करूनही मद्यपी पर्यटक प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना आवरण्यासाठी वेगळेच पाऊल उचलण्याचा निर्णय दुर्गमित्र आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.किल्ल्याचे पावित्र नष्ट करणार्‍या या पर्यटक आणि प्रेमी युगलांचे चित्रीकरण करून, ते सोशल मिडीयाच्या माध्यामातून आता वायरल करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना पोलीसांच्याही स्वाधीन करण्यात येणार असून, पुरातत्व विभागामार्फत गुन्हे दाखल करण्याचाही निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी एक मोहिम आयोजित करण्यात आली असून,त्यात ग्रामस्थ,ग्रामपंचायत,पोलीस,पुरातत्व विभाग आणि दुर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गमित्रांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -