घरताज्या घडामोडीदुबईवरून आलेल्या १८ खेळाडूंची अखेर सुटका; सर्वच खेळाडू निगेटिव्ह!

दुबईवरून आलेल्या १८ खेळाडूंची अखेर सुटका; सर्वच खेळाडू निगेटिव्ह!

Subscribe

नवी मुंबईत क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या टेनिस खेळाडूंची करोना चाचणी अखेर निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुबईवरून आलेले नवी मुंबईतील टेनिस क्रिकेट संघातील सर्व खेळाडू करोना निगेटिव्ह आहेत. त्यांना अखेर घरी सोडण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी खारघर येथील ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला होता. संपूर्ण १८ जणांच्या या संघाला दुबईवरून आल्यानंतर नवी मुंबईतील ग्राम विकास भवनात चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांची सुटका झाली. यावेळी नातेवाईकांनी खेळाडूंना घरी नेण्यासाठी गर्दी केली होती. रविवारपासून या कक्षात ३५ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये २५ जण दुबई येथे क्रिकेट स्पर्धेसाठी गेले होते. सोमवारी वेळेत नाश्ता मिळाला नाही, पाण्याची गैरसोय झाली, अशी तक्रार या खेळाडूंनी केली.

खेळाडू पोहोचले होते थेट स्वत:च्या घरी!

टेनिस क्रिकेट संघातील पनवेल मधील खेळाडूंची दुबईत रंगलेल्या टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वर्णी लागली होती. स्पर्धा सुरु असतानाच करोना विषाणूचे भय संपूर्ण जगाला भेडसावत होते..म्हणूनच मागील आठवड्यात शुक्रवारी स्पर्धा संपल्यावर नवी मुंबईतील खेळाडूंनाही भारतात परतावे लागले. दुबईत करोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याने या खेळाडूंना घरी जाऊ न देता विमानतळावरून खारघरमधील थेट ग्राम विकास रुग्णालयात हलवण्यात येणार होते. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे खेळाडू रुग्णालयात न जात थेट स्वतःच्या घरी पोहोचले.

- Advertisement -

कोणतीही वैद्यकीय चाचणी न करता हे खेळाडू निसटल्यामुळे प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि नवी मुंबई परिसरात एकच खळबळ माजली. काही तासाच्या विलंबाने प्रशासनाला या खेळाडूंना रुग्णालयात चाचणीसाठी आणण्यात यश आले. या सर्व खेळाडूंची करोना चाचणी झाली असून हे सारे खेळाडू निगेटिव्ह आढळून आले असल्याने अखेर प्रशासनाने त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली.


Coronavirus: ‘नागपुकरांनो ऐकलं नाही तर बळजबरीनं घरी बसाववं लागेल’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -