घरताज्या घडामोडीमोठी बातमी: मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित

मोठी बातमी: मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित

Subscribe

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अेक भागत सोमवारी सकाळी वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबईतील दहीसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, बांद्रा, विले पार्ले, पवई या भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाले असल्याचे ट्विट बेस्ट कडून करण्यात आले आहे.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर येथील उपकेंद्रामधील पॉवर ग्रीड आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रीपिंग झाल्यामुळे संपुर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मुंबईच्या उपनगरांना ३६० मेगावॅटचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीला फटका बसल्यामुळे मुंबईकरांची सोमवारी सकाळी चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे मुंबईची लोकल सेवा ठप्प झाली आहे. मुंबईतील लोकल एकाच जागी उभ्या असल्यामुळे प्रवाशी ट्रेनमधून उतरून पायी चालत जात आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगराला मोठा फटका बसला असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा पुन्हा पुर्ववत होण्यासाठी किमान २ तासांचा अवधी लागू शकतो.

- Advertisement -

“देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना कळवा-पडघा येथील वीज उपकेंद्रात थोडा बिघाड झाला. त्यामुळे मुंबईतील वीज सेवा खंडीत झाली. मात्र विद्युत विभागातील कर्मचारी युद्ध स्तरावर काम करत असून काही तासातच वीज पुरवठा सुरळीत होईल”, अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -