घरमुंबईजागरुकता कोमात, एड्स जोमात

जागरुकता कोमात, एड्स जोमात

Subscribe

एड्सला वेसण घालण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तरीही बदलती जीवनशैली आणि असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे एड्सचा राक्षस आ वासून पुढे उभा आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी आणि वसई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार हेच चित्र दिसते आहे.

एड्सला वेसण घालण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तरीही बदलती जीवनशैली आणि असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे एड्सचा राक्षस आ वासून पुढे उभा आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी आणि वसई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार हेच चित्र दिसते आहे.

वसईत पाच महिन्यांत एड्सचे ७२ रुग्ण 

वसईमध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत एड्सचे तब्बल ७२ रुग्ण आढळल्यामुळे महापालिका प्रशासन हादरले आहे. या रोगावर उपचार करण्यासाठी अ‍ॅण्टी रेट्रोव्हायरल थेरपी अर्थात एआरटी कक्ष उभारण्याची धावपळ सध्या सुरू आहे. परप्रांतियांचे मोठ्या प्रमाणात असलेले वास्तव्य, अमली पदार्थांची विक्री, अनधिकृत रिसॉर्ट, लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाने वसई तालुक्यात बस्तान बसवले. त्या पार्श्वभूमीवरच एड्सचे ७२ रुग्ण आढळले आहेत, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात क्षयरोग आणि गरोदर मातांची तपासणी करण्यात आल्यावर त्यात एचआयव्हीबाधित ७२ रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. महापालिकेकडे कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याने शासनाच्या जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांनी महापालिकेला विनामूल्य औषधे देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे वसई पूर्वेला वालिव येथे एआरटी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे.

या सेंटरमध्ये रुग्णांना विशिष्ट औषधे दिली जातात. त्याचा परिणाम कसा होतो, हे पाहण्यासाठी नियमित तपासण्या केल्या जातात. एड्सबाधित रुग्णांसाठी लागणारी औषधे महाग असतात. त्यासाठी प्रत्येक रुग्णामागे दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो. ही औषधे मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मिळत होती. त्यानंतर केईएम किंवा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात जावे लागते. महापालिकेच्या सेंटरमध्ये ही औषधे उपलब्ध झाल्यास त्याचा या रुग्णांना परिणामकारक फायदा होईल, अशी आशा एड्सवर काम करणार्‍या कृपा फाऊंडेशनचे अमित पटेल यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

२०१८ मधील एड्स रुग्णांची संख्या

जानेवारी – १८
फेब्रुवारी – १२
मार्च -१४
एप्रिल – ९
मे – १९

स्त्री-पुरुष गुणोत्तर

पुरुष – ३०
महिला – ४२ (गर्भवती मातांचे प्रमाण १४ )


-रविंद्र माने, वसई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -