घरCORONA UPDATELockdown Crisis: व्हिडिओ कॉलद्वारे मुलाला करावे लागले आईवर अंत्यसंस्कार

Lockdown Crisis: व्हिडिओ कॉलद्वारे मुलाला करावे लागले आईवर अंत्यसंस्कार

Subscribe

हलाखीच्या परिस्थतीत ज्या आईने स्वतः उपाशी राहून आम्हाला पोटभर अन्न भरवले त्याच आईच्या अंत्यविधीसाठी लॉकडाऊनमुळे जाता आले नाही, तिचा अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलद्वारे बघावा लागला याच्यापेक्षा मोठे दुःख जगात काय असणार. असाच काहीसा प्रसंग डोंबिवली शहरात राहणाऱ्या एका मुलाच्या वाटेला आला आहे. डोंबिवली पूर्वेतील संगमेश्वर गार्डन येथे राहणारा महंतेस भीमाशंकर सगुमाले (३८) असे या दुर्देवी मुलाचे नाव आहे. मूळचा सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट गावात लहानाचा मोठा झालेला महंतेस हा काही आपल्या कुटुंबाना सोडून वर्षांपूर्वी मुंबईत नोकरीच्या शोधात आला होता.

महंतेसला मुंबईत एका चांगल्या कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाची नोकरी लागली. लग्नानंतर महंतेस हा पत्नीसोबत मुंबईपासून जवळ असणाऱ्या डोंबिवलीत स्थायिक झाला. गावाकडे आई, भावंडे सोडून डोंबिवलीत स्थायिक झालेला महंतेसचे आपल्या आईवर जीवापाड प्रेम होते. तिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत महंतेस आणि इतर मुलांना लहानाचे मोठे केले. त्यांचे शिक्षण पुर्ण केले. महंतेस हा डोंबिवलीत राहून देखील गावी मोठ्या भावासोबत राहणाऱ्या आईला काहीही कमी पडू देत नव्हता.

- Advertisement -

महंतेसने ८० वर्षाची आई मोहनबाई यांना फुफ्फुसाचा आजार होता, मार्च महिन्यात महंतेसच्या मोठ्या भावाने आईला तालुक्यातील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र २२ मार्च पासून देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महंतेसला आईला साधे बघायला जाता आले नाही. त्याने फोनवरच आईच्या तब्येतीची चौकशी केली होती. प्रकृती थोडीफार सुधारल्यानंतर मोहनाबाई यांना डॉक्टरांनी घरी सोडले होते.

रविवारी दिनांक १२ एप्रिल रोजी महंतेसने आईला फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी केली. माझी तब्येत ठीक आहे. तुमची काळजी घ्या म्हणून आई म्हणाली आणि दुसऱ्याच दिवशी तिचा प्राण गेल्याचे फोनवर कळले असे महंतेसने सांगितले. आईला शेवटचे बघून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावी जावे लागणार होते. परंतु लॉकडाऊनमुळे गावी जाण्यासाठी परवानगी काढावी लागेल यासाठी महंतेसने सोमवारी सायंकाळीच डोंबिवलीच्या टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. मात्र आम्ही पत्र देऊ शकत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

due to lockdown a son Could not attend mother's funeral

महंतेसने मंगळवारी सकाळीच कल्याण खडकपाडा गाठून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेतली. मात्र प्रवासाचे परवाना पासेस ऑनलाईन उपलब्ध असून तुम्ही ऑनलाईन अर्ज करा, असे उत्तर देण्यात आल्याचे महंतेस म्हणाला. “मी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र वेबसाइटवर मृत्यूचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार होते. ते माझ्याकडे नव्हते आणि आईचा मृत्यू घरातच झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध होणार नव्हते. जरी उपलब्ध झाले तरी “वेबसाइटने ज्या काही कागदपत्रांची मागणी केली, त्याची साइज वेबसाईटवर अपलोड होणे अवघड होते. त्यात फोटोचा आकार कमी करणे शक्य नव्हते. एवढे सर्व करून परवानगी मिळायला वेळ लागेल आणि सोलापुरात जाण्यासाठी सुमारे ६ तासाचा अवधी लागणार होता. शेवटी मी घरी आलो आणि आमच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून आईचे शेवटचे दर्शन घेतले. व्हिडिओ मधूनच आईचा अंत्यविधी पार पाडला, असे महंतेस म्हणाला.

माझ्या आईने आमच्यासाठी खूप काही केले, खूप त्याग केले आणि तिच्या अंत्यदर्शनासाठी मी पोहोचू शकलो नाही, याची खंत आयुष्यभर राहील असे महंतेसने आपला महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -