घरमुंबईडंप केलेल्या स्क्रॅप बोटीमुळे घडला शिवस्मारक परिसरात अपघात

डंप केलेल्या स्क्रॅप बोटीमुळे घडला शिवस्मारक परिसरात अपघात

Subscribe

बुधवारी शिवस्मारकाच्या परिसरात बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेला स्मारक परिसरात बुडालेल्या बोटीचे अवशेष कारण ठरले आहेत. सुमारे १६ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील एक प्रवाशी बोट स्मारक परिसरातील खडकावर आदळून बुडाली होती. या बोटीचे अवशेष दूर करण्यात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची उघड झाले आहे.

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित खडकावर आपटून बुडाली. सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

१९९३ च्या सुमारास कुलाबा लाईट हाऊसजवळ हे जहाज बुडाले होते. त्याचे अवशेष आजही आहे तिथेच आहेत. एकीकडे खडकाळ भाग असताना दुसरीकडे बुडालेल्या बोटीच्या अवशेषामुळे यापूर्वी अपघात झाला नाही, याचेच आश्चर्य वर्तवले जात आहे. यामुळेच या परिसरात मच्छिमार जाणे टाळतातमहत्त्वाचे म्हणजे हा सांगाडा वेळीच काढला असता तर कालची घटना टळली असती. यामुळे भविष्यातही दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. याआधी २००८ साली देखील याठिकाणी मच्छिमारांच्या ट्रॉलरला अपघात झाला होता. त्यावेळी भास्कर तांडेल या मच्छिमाराने ७ जणांचे जीव वाचवले होते.

दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटीजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी चार बोटी गेट वे ऑफ इंडियावरून रवाना झाल्या होत्या. यातील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट शिवस्मारकारकाजवळ आली असता खडकाला धडकली आणि या बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. अपघातानंतर बोट समुद्रात बुडाली. त्यानंतर जवळपास सव्वा चार वाजता कोस्टगार्डला पाचारण करण्यात आले.

- Advertisement -

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ठरला होता कार्यक्रम

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात मेटेंना हा भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकायचा होता. मात्र यावेळी कोणीच तयार न झाल्याने तसेच परतीचा पाऊस पडू शकतो या भितीने आणि काही तांत्रिक अडचणीमुळे पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. मात्र अचानक हा कार्यक्रम २४ तारीखला घ्यायचे ठरले. पण त्याची कसलीच पूर्व कल्पना संबंधित विभागाला देण्यात आली नव्हती. तसेच या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पत्रकार येतील याची देखील कल्पना अधिकार्‍यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नियोजनाचा अभाव आणि श्रेयाच्या लढाईमुळे २५ जणांचे जीव धोक्यात घालण्यात आले.

अचानक संबंधित विभागांना कळवले 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाबाबत संबंधित विभागांना देखील अचानक कळवण्यात आल्याची माहिती आहे. कुलाबा पोलीस स्टेशनला तर सकाळी ११ वाजता कळवण्यात आले होते. तसेच इतर विभागांनादेखील अचानक सांगितले गेल्याने पूर्व तयारी करायला कुणालाच वेळ मिळाला नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा शासकीय कार्यक्रम नव्हता. त्यामुळे पत्रकारांना विनायक मेटे यांनी स्वत:च या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याचे सांगण्यात येत आहे.

मोदींच्या भुमिपूजनापासूनच मेटे नाराज  

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या भुमिपूजनाचा सोहळा पार पडला होता. या भुमिपूजनावेळी देखील मेटेंना डावलल्याने त्यांची नाराजी दिसून आली होती. तेव्हा नाराज मेटेंनी भाजपला जाब विचारला होता. त्यामुळेच पंतप्रधानांनी भुमिपूजन केल्यानंतरही मेटेंनी श्रेयासाठी पुन्हा भूमिपूजनाचा घाट घातलाय की काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -