घरठाणेठाणे रेल्वेस्थानकात तांत्रित बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रित बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. ठाणे स्थानकातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे समजते.

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. ठाणे स्थानकातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे समजते. शिवाय, या बिघाडाबाबत प्रवाशांना कोणतीही सूचना रेल्वे स्थानकात किंवा लोकलमध्ये दिली जात नसलची माहिती समोर येत आहे. (Due to technical fault on thane railway station central railway local service stop)

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील डाऊन जलद मार्गावरून डाऊन धीम्या मार्गावर जाणाऱ्या मार्गावर बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6:40 वाजताच्या सुमारास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे डाऊन जलद, डाऊन धीम्या आणि अप धीम्या मार्गावर परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा खोळंबा झाला आहे. ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. स्थानकातील गर्दीमुळे प्रवाशांना धक्काबुक्कीता त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, प्रवाशी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे रुळावरू चालत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ठाणे स्थानकातील बिघाडामुळे मुंबईहून कल्याण आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर परिणाम झाला आहे. बिघाडामुळे कांजुरमार्ग स्थानकात लोकल थांबवण्यात आल्या आहेत. शिवाय, ठाणे स्थानकातही लोकल थांबवण्यात आल्याने, त्यांच्या एका मागोमाग एक लोकल खोळंबल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -