घरताज्या घडामोडीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच 'जे.जे' च्या परिसरात तुंबले पाणी 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच ‘जे.जे’ च्या परिसरात तुंबले पाणी 

Subscribe

बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जे. जे. रुग्णालय व परिसरात साचलेल्या पाण्याला रुग्णालय व्यवस्थापनच जबाबदार आहे. ‘जे.जे.’ रुग्णालयातील अंतर्गत बंदिस्त गटारांची साफसफाई व्यवस्थापनाला कोविडच्या काळात करता आलेली नाही. विशेष म्हणजे  ‘जे.जे.’चा अंतर्गत परिसरात हा उंचावर आहे आणि मागील ५० ते ६० वर्षात या भागात पाणी तुंबले असे प्रकार घडले नाही. तसेच क्षमतेपेक्षा ताशी दीड पट अधिक पाऊस पडल्याने येथील पाणी रस्त्यांवर आले आणि कधी नव्हे ते ‘जे.जे.’च्या आसपासच्या परिसरात पाणी तुंबलेले पाहायला मिळाले.

दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ‘जे.जे.’च्या परिसरात पाणी जमा झाले. महापालिका रुग्णालयाच्या इमारतीत गुडघा भर पाणी साचले होते. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या या पावसामुळे’जे.जे.’चे रुग्णालय आणि आसपासच्या परिसर जलमय झाल्याने महापालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्यांच्या सफाईबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. येथील ब्रिटीश कालिन जलवाहिनी योग्यप्रकारे सफाई झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी तरी रुग्णालय आणि आसपासचा परिसर जलमय झाल्याने महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जे.जे.’चा परिसर उंचावर असून अंतर्गत पर्जन्य जलवाहिनी साफसफाई व दुरुस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु कोविडच्या काळात त्यांच्याकडून दुर्लक्ष केले गेले असावे. त्यातून पाण्याचा निचरा न झाल्याने ते पाणी साचून राहिले. त्यामुळे बुधवारी रात्री दोन पंप बसवून त्या पाण्याच्या निचरा करण्यात आला. मात्र, गुरुवारी सकाळी या पाण्याचा निचरा झाला होता. पंप लावून यातील पाणी मुख्य पर्जन्य वाहिनीत सोडण्यात आले. त्यानंतर येथील पाणी कमी झाले. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतर्गत भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

‘सर जेजे हॉस्पिटल’  या ठिकाणी बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळ मजल्यावरील भागामध्ये मोठया प्रमाणात पाणी तुंबले होते. या संदर्भात मुंबई महानगरपालिका व सर जेजे हॉस्पिटल व्यवस्थापनामार्फत पाण्याचा निचरा करण्यात आला. या संदर्भात गुरुवारी ६ ऑगस्टला   महानगरपालिका परिमंडळ १चे उपायुक्त हर्षद काळे तसेच सर जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे व हॉस्पिटलचे संबंधित अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे ई- वॉर्डचे परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता. जगताप, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अभियंता  राऊत, घनकचरा व्यवस्थापनाचे, ड्रेनेजचे सहाय्यक अभियंता डोंगरे व सर जेजे हॉस्पिटलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डोंबाले, अभियंता बनसोडे, अभियंता जंगले, राजपालआदींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये हा उद्भवलेला हा प्रश्न कायमस्वरूपी तातडीने सोडवण्यासाठी या विभागाच्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर,  माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -