घरमुंबईआरटीई प्रवेशाला 4 एप्रिलपर्यंत मुदवाढ

आरटीई प्रवेशाला 4 एप्रिलपर्यंत मुदवाढ

Subscribe

पालकांच्या मागणीनंतर निर्णय

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षणांतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत राज्यातील 67 हजार 706 विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्रांची पडताळणी करून 26 एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करायचे होते. परंतु ही वेळ अपुरी पडत असल्याने प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पालक व संघटनांकडून करण्यात येत होती. पालक व संघटनांच्या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाला 4 मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील तब्बल 32 हजारपेक्षा अधिक पालकांना दिलासा मिळाला आहे.

ज्युनिअर केजी आणि प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 2019-20 शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशासाठी राज्यात 9195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी 2 लाख 44 हजार 933 पालकांनी अर्ज केले होते. आरटीई प्रवेशाची 8 एप्रिलला पहिली सोडत जाहीर झाली. यामध्ये राज्यातून 67 हजार 706 जागांची यादी जाहीर झाली. यामध्ये मुंबईतून तीन हजार 532 विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. सोडतीमधील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेजवळील केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक होते.

- Advertisement -

मात्र कागदपत्रांच्या पडताळणीत पालकांना येणार्‍या समस्यांमुळे आतापर्यंत राज्यातून फक्त 35 हजार 61 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. कागदपत्रांच्या पडताळणीतील विलंबामुळे प्रवेश निश्चिती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील पालक व संघटनांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत 25 एप्रिलला प्रवेश निश्चिती प्रक्रियेला 4 मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला. यामुळे ज्या पालकांनी अद्याप प्रवेश घेतलेले त्यांना दिलासा मिळाला आहे.

सर्वाधिक प्रवेश झालेले जिल्हे
जिल्हा प्रवेश
पुणे 7359
ठाणे 3451
नागपूर 2878
नाशिक 2226
मुंबई 1947
औरंगाबाद 1743
रायगड 1322

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -