घरCORONA UPDATECoronavirus - आता बेस्टच्या बसचे रूपांतर होणार अ‍ॅम्ब्युलन्समध्ये!

Coronavirus – आता बेस्टच्या बसचे रूपांतर होणार अ‍ॅम्ब्युलन्समध्ये!

Subscribe

मिनी बसमधील सिट्स काढून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये या बसेस रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. ड्रायव्हर केबिनपासून ते बसमधील उर्वरीत जागा ही बससाठी वापरण्यात येणार आहे.

मुंबई शहरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असतानाच आता बेस्ट परिवहन उपक्रमाने सध्याच्या ताफ्यातील एसी मिनी बसेस या एम्ब्युलन्समध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेमी एम्ब्युल्सन्सचा वापर हा कोरोना संशयिताची वाहतूक करण्यासाठी होणार आहे. कोरोना रूग्णाला घरापासून ते कोरोना केअर सेंटरपर्यंत नेण्यासाठी या मिनी बसेसचा वापर करण्यात येणार आहे. सध्या सात बसेस या सेमी एम्ब्युलन्समध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. आगामी काळात आणखी बसेस रूपांतरीत करण्यात येणार आहेत.

सध्याच्या मिनी बसमधील सिट्स काढून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये या बसेस रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. ड्रायव्हर केबिनपासून ते बसमधील उर्वरीत जागा ही बससाठी वापरण्यात येणार आहे. येत्या काळात आणखी २० बसेस एम्ब्युलन्समध्ये रूपांतरीत करण्यात येतील. त्यासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी लागणार आहे. काही तयार झालेल्या बसेस सध्या सेवेतही दाखल झाल्या आहेत. काही बसेस या सेमी एम्ब्युलन्समध्ये रूपांतरीत करण्यात येत आहेत तर काही बसेस पुर्णपणे एम्ब्युलन्समध्ये रूपांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या कोव्हिड १९ च्या रूग्णांची वाहतुक करणाऱ्या एम्ब्युलन्सवरील ताण कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सद्यस्थितीला १०८ क्रमांकाच्या ९३ बसेस उपलब्ध आहेत. तर ६६ एम्ब्युलन्स या कोव्हिड १९ च्या रूग्णांची वाहतूक कऱण्यासाठी वापरण्यात येत आहेत. सरासरी ४०० ते ५०० रूग्ण या एम्ब्युलन्सकडून हाताळण्यात येत आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून बेस्टकडून सरासरी १६५० इतक्याच बसेस ऑपरेट करण्यात येत आहेत. त्यापैकी ६५० बसेस या हॉस्पिटल कर्मचारी, पोलिस आणि सरकारी कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत आहे. बेस्ट बसेसचा वापर हा जेवणाचे पार्सल, सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि झोपडी भागात जीवनावश्यक गोष्टी पोहचवण्यासाठी होत आहे. सरासरी २.५ लाख फुड पॅकेट्स बेस्टमार्फत मुंबईतील २४ वॉर्डमध्ये वितरीत करण्यात येत आहेत. त्यामध्ये ७९ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून या बसेस रोजच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.


हे ही वाचा – ‘..तर केंद्राला राज्ये योगदान देणार नाहीत’, शरद पवारांनी लिहिलं मोदींना पत्र!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -