घरताज्या घडामोडीLockDown: आज मुंबईतून पहिली ट्रेन धावली

LockDown: आज मुंबईतून पहिली ट्रेन धावली

Subscribe

सर्व सामान्य प्रवाशांसाठी मुंबईतून मंगळवारी पहिली रेल्वे गाडी दिल्लीला रवाना झाली आहे. मुंबई सेंट्रलवरून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिल्लीसाठी ही विशेष ट्रेन धावली असून या ट्रेनमध्ये सुमारे १ हजार ४८७ प्रवाशांनी प्रवास केला. या गाडीचे प्रवासी दुपारी १२ वाजेल्यापासून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात जमा झाले होते. रेल्वेकडून या प्रवाशांची सर्व प्रकारची तपासणी करून मुंबईतील प्रवासी दिल्लीकडे रवाना झाले आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून देशभरातील रेल्वे प्रवासी सेवा २३ मार्चपासून पूर्णपणे बंद होती. भारतीय रेल्वे सेवा सुरळीत सुरू करण्यासाठी १२ मे २०२० पासून ३० विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून मंगळावरी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिल्लीसाठी ही विशेष ट्रेन धावली असून ही ट्रेन बोरिवली, सुरत, वडोदरा, रतलाम, नागडा आणि कोटा स्थानकात थांबणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ‘राजधानी’ प्रमाणे ट्रेन धावली. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे आणि ५ द्वितीय श्रेणीचे एसी डबे आहे.

- Advertisement -

मंगळवारी ज्या प्रवाशांची तिकीट आरक्षित आहे. त्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर १२ वाजतापासून जमा व्हायला लागले होते. त्याप्रमाणे सुरक्षेचा दुष्टीने रेल्वेने सुद्धा मोठ्या प्रमाणात काळजी घेतली आहे. प्रत्येक प्रवाशांची तपासणी करून त्यांना ट्रेनमध्ये बसण्यास परवानगी रेल्वेकडून देण्यात आली होती. तसपाणीसाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर तब्बल ६ वैद्यकीय तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. तसेच रेल्वे स्थानकाचा सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले होते. प्रवाशांचे लगेज तपासणीपासून ते मास्क घालण्यापर्यंतची चौकशी रेल्वे पोलीस करत होते. रेल्वे डब्यात फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करून आसन व्यवस्था केली होती. त्यानुसार तृतीय श्रेणी एसीकरिता १ हजार ७९५, द्वितीय श्रेणी एसीला २ हजार ५८५ तिकीट आकारण्यात आले. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ट्रेन बोरिवली, सुरत, वडोदरा, रतलाम, नागडा आणि कोटा स्थानकात थांबणार आहे.

३० विशेष रेल्वे सेवा सुरू

भारतीय रेल्वे सेवा सुरळीत सुरू करण्यासाठी १२ मेपासून ३० विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० एसी ट्रेन सुरू केल्या आहेत. या ट्रेन नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रल, डिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळूरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तवीला या शहरासाठी या गाड्या सोडण्यात येतील. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्टेशनवरून या गाड्या दिल्लीसाठी सुटण्याचे नियोजन रेल्वे प्रशासन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -