घरCORONA UPDATECorona Effect: मुंबईतील गोरगरिबांना देणार दाल खिचडी!

Corona Effect: मुंबईतील गोरगरिबांना देणार दाल खिचडी!

Subscribe

बेघर नागरिकांच्या मदतीसाठी आयआरसीटीसी धाव घेतली. १ लाख नागरिकांना जेवण पुरविण्याची योजना आयआरसीटीसी आखत आहे.

देशभरता करोना विषाणूने थैमान घातले आहे. तसेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषणा केली आहे. त्यांच्या सर्वाधिक फटका मुंबईतील बेघर आणि गोरगरिब नागरिकांना बसत आहे. या उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गोरगरीब जनतेवर उपाशी राहण्याची पाळी आली आहे. मात्र त्यांच्या मदतीसाठी आयआरसीटीसीने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील बेघर आणि गोरगरिब नागरिकांना खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी योजना आयआरसीटीसी आखत आहे.

शिजवलेले अन्य पुरवठा करण्याचे निर्देश

भारतासह संपूर्ण जगात करोना विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य प्रशासनाकडून योग्य ते निर्णय घेण्यात आले आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. परिणामी तसेच भारतीय जनतेला घराबाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे. मात्र या करोना विषाणूचा सर्वाधिक फटका देशासह राज्यातील बेघर, गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे अशा आपत्कालीन पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी ) महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतातील सर्व आयआरसीटीसीचे झोनल मुख्य कार्यालयाला एक परिपत्रक पाठविण्यात आले आहे. ज्यात सांगण्यात आले की, बेघर गोरगरिबांचा मदतीसाठी जेवणाची सोय करण्यात यावी. जर पुढे परिस्थिती वाईट झाली तर सर्व आयआरसीटीसी झोनल विभागातून बेघर आणि गरीब नागरिकांना शिजवलेले अन्य पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व आयआरसीटीसीचे सर्व झोनल विभाग आता तयारीला लागले आहेत.

- Advertisement -

बेघर नागरिकांना आयआरसीटीसी देणार जेवण

२०११ च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात ५७ हजार ४१६ नागरिक बेघर राहतात. यातील बहुतांश गोरगरीब नागरिक एकट्या मुंबईत राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊन नयेत, त्यांच्या मदतीसाठी आयआरसीटीसीने पुढाकार घेतला आहे. अशा १ लाख नागरिकांना येणाऱ्या परिस्थितीत जेवण पुरविण्याची योजना आयआरसीटीसी योजना आखत आहे. त्यांना काय पौष्टिक खाद्यपदार्थ द्यावेत यावर विचार सुरू आहे. त्यांना दाल खिचड्डी देण्याच नियोजन आयआरसीटीकडून करण्यात येत आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहेत.

होणार किचन सुरू

करोनाचा पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड कॉर्पोरेशनने (IRCTC)यापूर्वी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या १४ एप्रिल पर्यंत रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. तसेच रेल्वेस्थानकावरील फूड फ्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद करण्यात येणार आहे. मात्र गोरगरीब जनतेचा सेवेसाठी आयआरसीटीसी आपले किचन सुरू करण्याचा विचारात असल्याची माहिती आयआरसीटीसीचा अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

- Advertisement -

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गोरगरिबांना मोठा फटका बसणार आहे. त्यांच्या मदतीसाठी आयसीटीच्या मुख्यालयातून सर्व झोनल कार्यलयाला एक पत्र आले आहे. त्यांच्या मदतीसाठी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. – पिनाकिन मोरावाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी


हेही वाचा – CoronaVirus: रिलायन्स कंपनी कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट देणार!


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -