घरCORONA UPDATECoronaVirus: कल्याणात दवाखानेही लॉकडाऊन, डॉक्टर गायब!

CoronaVirus: कल्याणात दवाखानेही लॉकडाऊन, डॉक्टर गायब!

Subscribe

कल्याण मधील दवाखाने बंद असल्यामुळे नागरिकांची शासकीय आणि खासगी रुग्णालयात गर्दी होतेय.

एकीकडे करोनामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले असून त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यातून रुग्णालये, दवाखाने यांसारख्या जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले असले तरी कल्याणात मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. कल्याणातील बहुतांश लहान मोठे दवाखाने चक्क बंद करण्यात आले असून डॉक्टरही गायब झाले आहेत. परिणामी आधीच करोनामुळे घाबरलेले नागरिक दवाखाने बंद असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयात मोठी गर्दी करत आहेत.

दवाखाने बंद केलेल्या डॉक्टरांवर करा कारवाई 

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पण दूध, भाजीपाला, औषधे आणि दवाखाने, रुग्णालये यासारख्या अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तरीही कल्याणात बहुतांश ठिकाणी असणारे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी सर्दी-खोकल्यासारख्या किंवा इतर छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना शासकीय किंवा खासगी रुग्णालयात जावं लागतं आहे. तर आधीच शासकीय रुग्णालयात करोनामुळे तपासणीसाठी लोकांची मोठी गर्दी झालेली असताना त्याठिकाणी जाण्यासाठी नागरिक काहीसे घाबरत आहेत. मात्र नाईलाजास्तव त्यांना हा मार्ग निवडावा लागतोय. तर दवाखाने बंद ठेवल्याने इतर रुग्णालयावर येणारा ताण पाहता ज्यावेळी लोकांना खरी गरज आहे त्याचवेळी हे दवाखाने बंद करून गेलेल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: नागरिकांच्या परिस्थितीचा दुकानदारांनी गैरफायदा घेवू नये – नरेश म्हस्के


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -