घरमुंबईपालिकेचा ई-निविदा घोटाळा उघड

पालिकेचा ई-निविदा घोटाळा उघड

Subscribe

झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढल्या

झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढल्यामुळे वसई-विरार महापालिकेचा ई -निवीदा घोटाळा उघडकिस आला आहे. याप्रकरणी मनसेच्या धक्क्यानंतर या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.प्रभाग समिती अ, विरार-बोळींजमध्ये 106 कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.या कामांपैकी अधिकाधिक कामे यापुर्वीच झाल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निदर्शनास आल्यामुळे हा ई-निविदा घोटाळा उघडकिस आला. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने शाखा अभियंता प्रदीप पाचंगे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यावर सर्व अभियंत्यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे यावेळी पाचंगे यांनी त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांकडे तक्रार केली त्यावर या सर्व निविदा ताबडतोब रद्द करण्याचे आदेश बळीराम पवार यांनी पाचंगे यांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -