घरताज्या घडामोडीमुंबईतील 'इस्टर्न फ्री वे'ला 'या' माजी मुख्यमंत्र्यांचे नाव

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचे नाव

Subscribe

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाला केली. राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या.

…म्हणून त्यांचे नाव

दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिशा दिली. तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचं योगदानसुद्धा महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.

हेही वाचा – राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -