घरमुंबईपूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीसाठी @ २३६ कोटी

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीसाठी @ २३६ कोटी

Subscribe

मुंबईत वाढत्या वाहन संख्येमुळे व अतिक्रमण होत असल्याने रस्ते कमी पडू लागले आहेत. मुंबई महापालिका दरवर्षी दर्जेदार रस्ते बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग पालिकेच्या अखत्यारित नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात अडचणी येतात.

मुंबईः मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आता मुंबई महापालिका करणार आहे. याअंतर्गत, वांद्रे-दहिसरसाठी महार्गासाठी १४३ कोटी रुपये तर शीव-मुलुंडसाठी महामार्गासाठी ९३ कोटी रुपये असे एकूण २२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबईत वाढत्या वाहन संख्येमुळे व शहरात अतिक्रमण होत असल्याने रस्ते कमी पडू लागले आहेत. मुंबई महापालिका दरवर्षी दर्जेदार रस्ते बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग पालिकेच्या अखत्यारित नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात अडचणी येत होत्या.

- Advertisement -

मात्र राज्य सरकारने, आता हे दोन्ही महामार्ग देखभाल व दुरुस्ती कामांसाठी पालिकेच्या ताब्यात दिले आहेत.
मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत प्राधिकरणांच्या पूर्व आणि पश्चिम मार्गांची देखभाल-दुरुस्ती आता महापालिका करणार आहे. यामध्ये वांद्रे ते दहिसर या पूर्व द्रुतगती मार्गासाठी पालिका १४३ कोटी तर शीव ते मुलुंड मार्गासाठी ९३ कोटी खर्च करणार आहे.

पालिकेने या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या असल्याची माहिती पायाभूत सुविधा उपआयुक्त उल्हास महाले यांनी दिली. पालिकेने महामार्ग दुरुस्ती कामे केल्यावर सदर महामार्ग रहदारी, वाहतुकीसाठी सुरक्षित व सुलभ होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई महापालिकेतील कोरोना विषयक कंत्राटकामे, रस्ते कामे, भूखंड खरेदी आदी कामांबाबत कॅगकडून चौकशी होणार आहे. गेल्या वर्षी हा निर्णय जाहिर करण्यात आला. तसेच  मुंबई महापालिकेने मुंबईतील ५,८०० कोटी रुपयांच्या सीसी रोड कामांची निविदा प्रक्रिया अचानकपणे रद्द करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
सदर रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही, असे प्रमुख कारण देत पालिकेने ५,८०० कोटींच्या रस्ते कामांची निविदा प्रक्रिया अचानकपणे रद्द केल्याने चर्चांना उधाण आले.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. सध्या पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हे पालिकेचा कारभार हाकत आहेत. त्यांनीच पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -