घरताज्या घडामोडीMoney laundering case: बिल्डर आणि चित्रपट निर्माते युसूफ लकडावालाला ईडीने केले अटक

Money laundering case: बिल्डर आणि चित्रपट निर्माते युसूफ लकडावालाला ईडीने केले अटक

Subscribe

खंडाळ्यातील हैदराबाद नवाबाच्या ५० कोटी रुपयांच्या जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे बनविल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबईचे बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते युसूफ लकडावालाची (Yusuf M Lakdawala) अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज शुक्रवारी ईडीने युसूफ लकडावालाला अटक केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार मनी लॉन्ड्रिंग (Money laundering case) कायद्याच्या कलमान्वये लकडावालाला अटक केली असून त्यानंतर आता त्यांना एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपी युसूफ लकडावालाला २ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील मावळ तहसील अंतर्गत खंडाळ्यातील ५० कोटी रुपयांच्या जमीनचे बनावट कागदपत्र केल्याने आणि फसवणूक केल्यामुळे मुंबईत पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेद्वारे २०१९मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्याच्या आधारे ७६ वर्षीय लकडावाला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणातील खंडाळ्यातील ४.४ एकर जमीन हैदराबादच्या तत्कालीन नवाब जंग बहादूर (Hyderabad Nawab Himayat Nawaz Jung Bahadur)  कुटुंबाची असल्याचे सांगितले जात आहे. लकडावालाने काही सरकारी अधिकारी आणि इतर लोकांसोबत मिळून या जमिनीची खोटी कागदपत्रे बनवली. ज्यामध्ये लिहिले होती की, १९४९ साली ही जमीन लकडावालाचे वडिलांना खरेदी केली होती आणि त्यानंतर त्या भेट म्हणून ही जमीन दिली.

- Advertisement -

ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लकडावालाने अनेक बनावट कंपन्या तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -