घरताज्या घडामोडीईडीकडून युनिटेक ग्रुपची ८१ कोटींची मालमत्ता जप्त; शिवालिक ग्रुपही अडचणीत 

ईडीकडून युनिटेक ग्रुपची ८१ कोटींची मालमत्ता जप्त; शिवालिक ग्रुपही अडचणीत 

Subscribe

ईडीकडून युनिटेक कंपनीच्या अनियमितपणे व्यवहाराचा तपास सुरू आहे.

अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून कारवाईचा सपाटा सुरूच आहे. ईडीने बुधवारी युनिटेक ग्रुपच्या मालकीची ८१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये १०१ जमिनीचे तुकडे आणि एका हेलिकॉप्टरचा समावेश आहे. जमिनीचे तुकडे मुंबईच्या सांताक्रूझ येथील असून ते शिवालिक ग्रुपच्या मालकीचे आहेत. तर हेलिकॉप्टर हे किंग रोटर एअर चार्टर प्रायव्हेड लिमिटेड कंपनीच्या मालकीचे असून ती कंपनी शिवालिक ग्रुपशी संबंधित आहे. काही दिवसांपूर्वी युनिटेक कंपनीच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे.

ईडीकडून युनिटेक कंपनीच्या अनियमितपणे व्यवहाराचा तपास सुरू आहे. युनिटेक कंपनीने शिवालिक ग्रुपला ५७४ कोटी रुपये दिले होते. मात्र, ते पैसे का दिले? इतकी मालमत्ता कुठून आणली? या संबंधित अनेक प्रश्नांचा खुलासा होत नव्हता. या पैशांमधून शिवालिक ग्रुपने जमीन आणि हेलिकॉप्टर विकत घेतल्याची माहिती ईडीच्या अधिकार्‍यांना तपासातून मिळाल्याचे वृत्त, वृत्तसंस्था युएनआयच्या वेबसाईटवर देण्यात आले होते. अखेर ईडीने याप्रकरणी कारवाई करत युनिटेक ग्रुपची ८१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

- Advertisement -

युनिटेक कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी तपास करत असताना कंपनीने अनेक व्यवहार अनियमित केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी ४ मार्च रोजी देशात आणि मुंबईत मिळून सुमारे ३५ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या चौकशीत युनिटेक कंपनीने काही कंपन्यांमध्ये पैसे फिरवल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी अनेकांच्या चौकशा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -