मुंबई : ईडीने आज गुरुवारी (22 फेब्रुवारी) मुंबईतील हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालये आणि इतर ठिकाणांवर छापे टाकले. फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट, 1999) शी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय एजन्सीने व्यावसायिक गटावर ही कारवाई केली. (ED Raid On Hiranandani Group ED Raid On Hiranandani Group)
निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांनी 1978 मध्ये हिरानंदानी ग्रुपची स्थापना केली. ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे. हा व्यवसाय समूह भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक आहे. हिरानंदानी समूहाचे मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे अनेक रिअल इस्टेट प्रकल्प आहेत.
हेही वाचा : Ludo Game Turns Deadly: लुडो बेतला जीवावर; कात्रीने मित्राचा कापला गळा अन् हत्येनंतर स्वतःलाही संपवलं
टीएमसीच्या निलंबित खासदार महुआ मोईत्रा यांच्या ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात हिरानंदानी ग्रुपही चर्चेत होता. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रारीत महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या वतीने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता. दर्शन हिरानंदानी हे निरंजन हिरानंदानी यांचे पुत्र असून, सध्या हिरानंदानी ग्रुपचे सीईओ आहेत.
हेही वाचा : Election Commission : निवडणूक आयोगाने घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, काय आहे कारण?
250 एकरामध्ये पसरलाय हिरानंदानी ग्रुप
हिरानंदानी समूहाच्या प्रकल्पांमध्ये इमारती, कार्यालयीन इमारती, रुग्णालये, शाळा, उद्याने, समुदाय केंद्रे, स्पोर्ट्स क्लब, बँका, शॉपिंग मॉल, फिल्म स्टुडिओ, बस गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि स्विमिंग पूल यांचा समावेश आहे. मुंबईत 250 एकरमध्ये पसरलेल्या या टाऊनशिपमध्ये 42 निवासी इमारती आणि 23 व्यावसायिक इमारती आहेत. ज्या SEZ श्रेणी ( स्पेशल इकोनॉमिक झोन) अंतर्गत येतात. डेटा सेंटर व्यवसायाच्या क्षेत्रातही हा गट आघाडीवर आहे. अलीकडेच हिरानंदानी ग्रुपने नोएडा, यूपी येथे दोन डेटा सेंटर्सची स्थापना केली आहे.
हेही वाचा : Hind Kesari : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मारले हिंद कसेरीचे मैदान; समाधान पाटील विजेता
याआधीही करण्यात आली होती कारवाई
मार्च 2022 मध्ये प्राप्तिकर विभागाने मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये पसरलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या सुमारे 25 मालमत्तांची झडती घेतली होती. विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तीकर विभागाने ही कारवाई कर चुकविल्याच्या संशयावरून केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी तीन शहरांमध्ये कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) समवेत समूहासाठी काम करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांची कार्यालये, सेल्स गॅलरी आणि काही जागांवर छापे टाकले होते. झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे ई-रेकॉर्ड आणि हिरानंदानी ग्रुपच्या विक्रीचे रेकॉर्ड स्कॅन केले.