बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्राच्या घरावर सक्तवसुली संचलानालयानं ( ईडी ) छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या सांताक्रुझ येथील घरावर छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. घरासह अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीनं अश्लील व्हिडिओ विविध अॅप्लिकेशन्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून कमावलेला पैसा नंतर परदेशात पाठवण्यात आला. याच मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीनं शिल्पा आणि राज यांच्या घरासह कार्यालय आणि संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : फडणवीस अन् अजितदादांचे हसरे चेहरे, शिंदेंचा चेहरा गंभीर; अडीच तासांच्या बैठकीनंतर काळजीवाहू ‘CM’ म्हणाले…
राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अश्लील व्हिडिओबाबत आरोपांवरून अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी व्हिडिओ संदर्भात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रा जामीनावर कारागृहातून बाहेर आला.
हेही वाचा : पहिल्यांदाच समोर आले शहाजीबापू, तीन नेत्यांना केलं टार्गेट; पराभवासाठी जिवलग मित्राला दिला दोष