घरक्राइमED Raid Teckchandani : बिल्डर टेकचंदानीच्या घरावर ईडीची छापेमारी; कोट्यवधीची रोकड जप्त

ED Raid Teckchandani : बिल्डर टेकचंदानीच्या घरावर ईडीची छापेमारी; कोट्यवधीची रोकड जप्त

Subscribe

तळोजा पोलीस स्टेशन आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तपास यंत्रणेने नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. तळोजा, चेंबूर येथे गृहनिर्माण सोसायटी बांधण्याच्या नावाखाली बिल्डर टेकचंदानी आणि इतरांनी सुमारे 1700 ग्राहकांकडून 400 कोटी रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले. ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्याना ना सदनिका दिल्या ना पैसे परत केले.

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने मुंबईतील ललित टेकचंदानी या बड्या बिल्डरवर कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने मुंबई आणि नवी मुंबईत 22 ठिकाणी छापे टाकले आहेत. सुप्रीम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवरही 7 फेब्रुवारी रोजी छापा टाकण्यात आला होता. केंद्रीय तपास यंत्रणेने या छाप्यात 27.5 लाख रुपये रोख, कोट्यवधींची एफडी आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केले होते. तर आतापर्यंतच्या छाप्यात एकूण मालमत्तेची कागदपत्रे आणि 30 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (ED Raid Teckchandani ED raid on builder Teckchandanis house Cash worth crores seized)

तळोजा आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तपास यंत्रणेने नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. तळोजा, चेंबूर येथे गृहनिर्माण सोसायटी बांधण्याच्या नावाखाली बिल्डर टेकचंदानी आणि इतरांनी सुमारे 1700 ग्राहकांकडून 400 कोटी रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले. ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना ना सदनिका दिल्या ना पैसे परत केले.

- Advertisement -

तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1700 लोकांकडून घेतलेले 400 कोटी रुपये टेकचंदानीने कुटुंबाच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरेदीसाठी गुंतवले होते. यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेक घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आणले होते. आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी याला फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यात अटकही केली होती.

हेही वाचा : Chavan Family & Congress : शंकररावांनीही केले होते काँग्रेसमध्ये बंड!

- Advertisement -

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अनेक घर खरेदीदारांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. ते म्हणाले की, तळोजा येथील टेकचंदानी बांधकाम प्रकल्पात 36 लाख रुपये गुंतवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीने त्यांना आश्वासन दिले होते की, हा प्रकल्प 2017 मध्ये तयार होईल, परंतु 2016 मध्ये त्याचे बांधकाम थांबले. अशा परिस्थितीत त्यांना ना फ्लॅट मिळाला ना त्यांचे पैसे परत मिळाले.

हेही वाचा : Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘इंडिया’ला धक्के; यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच काँग्रेसला गळती

काय आहे प्रकरण?

ललित टेकचंदानी बांधकाम व्यावसायिक आहे. मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याची याआधी याच प्रकरणी चौकशी केली होती. त्यानंतर अटकेची कारवाई केली. कलम 420 आणि 406 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -