घरताज्या घडामोडीYes बँकेतून घेतले होते भरमसाठ कर्ज; अनिल अंबानी यांना ईडीचे समन्स

Yes बँकेतून घेतले होते भरमसाठ कर्ज; अनिल अंबानी यांना ईडीचे समन्स

Subscribe

येस बँकेचे प्रवर्तक राना कपूर आणि इतरांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी संबंध असल्याच्या आरोपावरुन रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना ईडीने समन्स बजावले आहे. अनिल अंबानी यांना आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र प्रकृतीचे कारण देत त्यांनी चौकशीस येण्यासाठी थोडा वेळ मागून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना दुसरे समन्स बजावण्यात येऊन नवीन तारिख देण्याची शक्यता आहे.

रिलायन्स ग्रुपने येस बँकेकडून १२ हजार ८०० कोटींचे कर्ज घेतले होते. जे आता एनपीए झाले आहे. सहा महिन्यांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले होते की, रिलायन्स ग्रुप, एस्सेल, आईएलएफएस, डीएचएफएळ आणि व्होडाफोन इत्यादी कंपन्यांनी येस बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र या मोठ्या कंपन्यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे हे कर्ज एनपीएमध्ये रुपांतर झाले होते.

- Advertisement -

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांचे वक्तव्य प्रिवेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) च्या अंतर्गत रेकॉर्ड केले जाणार आहे. सध्या येस बँकेचे प्रवर्तक ६२ वर्षीय राणा कपूर ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर ४३०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला जात आहे. डिसेंबर २०१९ च्या तिमाहीत येस बँकेला १८ हजार ५६४ कोटींचा तोटा झाल्याची माहिती शनिवारी दिली. सध्या येस बँकेचा कारभार रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार प्रशांत कुमार पाहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -