घरCORONA UPDATECoronaVirus : आपत्कालीन परिस्थितील बदल्यांचा परिणाम आरोग्य सेवेवर 

CoronaVirus : आपत्कालीन परिस्थितील बदल्यांचा परिणाम आरोग्य सेवेवर 

Subscribe

कोविडचा प्रभाव शहरात वाढत असताना पालिकेच्या नायर, सायन, सेवन हिल हॉस्पिटलमधील अधिष्ठातांची महिनाभरात सातत्याने बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोविडमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्ण संख्या कमी करण्याकडे लक्ष देण्याऐवजी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्वाच्या रुग्णालयामधील अधिष्ठाता पदाच्या व्यक्तींमध्ये संगीत खुर्चीची स्पर्धा लावल्याच्या पाहायला मिळत आहे. कोविडचा प्रभाव शहरात वाढत असताना पालिकेच्या नायर, सायन, सेवन हिल हॉस्पिटलमधील अधिष्ठातांची महिनाभरात सातत्याने बदल्या करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या बदल्यांचा परिणाम प्रशासकीय कामकाजाबरोबरच रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींकडून वर्तवण्यात येत आहे.

सायन हॉस्पिटलमध्ये वॉर्डमध्येच रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे एक उत्तम प्रशासक असलेले पालिका हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश भारमल यांची तातडीने सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठाता यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र महिनाभरापूर्वी नायर हे कोरोना हॉस्पिटल करण्यास विरोध केल्याने पालिकेच्या सनदी अधिकाऱ्यांनी भारमल यांच्याकडून तडकाफडकी नायर हॉस्पिटलचा पदभार काढून घेतला. त्यामुळे त्यांच्याकडे पालिका वैद्यकीय विभागाच्या संचालक पदाची जबाबदारी कायम राहिल्याने त्यांना आपले बस्तान केईएम हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. त्याचवेळी काही महिन्यांपूर्वीच सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नियुक्त केलेल्या डॉ. मोहन जोशी यांची बदली नायर आणि सेवन हिल्स हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी करण्यात आली. तर सायन हॉस्पिटलचा भार डॉ. इंगळे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र सायन हॉस्पिटलमध्ये नुकत्याच घडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणावरून डॉ. इंगळे यांची उचलबांगडी करत, कोपऱ्यात फेकलेल्या भारमल यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न पालिकेतील सनदी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. डॉ. मोहन जोशी यांनी सायन हॉस्पिटलचा कारभार सुरळीतपणे चालवण्यास सुरुवात केली असतानाच कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्येक महिनाभरापूर्वी त्यांची बदली नायर व सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या अधिष्ठाता पदी करण्यात आली. तर सायन हॉस्पिटलसाठी डॉ. इंगळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र प्रभारी पदाचा कारभार हाती घेऊन काही दिवस उलटत नाही तोवर सायनमधील मृतदेह रुग्णांच्या बाजूला ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. कोरोनासारख्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये होणाऱ्या बदल्यांचा फटका प्रशासकीय कामकाजाबरोबरच रुग्ण सेवेवरही होण्याची शक्यता पालिकेतील कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्ण संख्या कमी करणे आणि त्यांची सेवा करणे यावर लक्ष देण्याऐवजी पालिकेतील सनदी अधिकाऱ्यांकडून अधिष्ठाता पदाच्या व्यक्तींच्या बदल्यांचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप पालिका कर्माचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अधिष्ठाता पदाच्या व्यक्तीच्या कामाच्या अनुभवाचा फायदा घेऊन नियोजन करणे आवश्यक असताना त्यांच्या बदल्या करणे हे योग्य नसल्याचे मत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

अधिष्ठाता पदावरील व्यक्ती ही फार अनुभवी असते. कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला पाहिजे. अधिष्ठाता पदावर नवीन व्यक्ती आल्यावर त्याला हॉस्पिटलमधील काही गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात तर लोकांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यास वेळ लागतो. त्यामुळे एखादी झाल्यास त्याला सुधारणा करण्यास वेळ द्या किंवा त्यांना काही सूचना देण्यात याव्यात. पण त्यांची बदली करणे हा योग्य पर्याय नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती ही बदली करण्याची योग्य वेळ नाही.

– ऍड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -