घरताज्या घडामोडीसंतोष राठोडनं लावला खाकीला बट्टा, सात कोटींच्या दरोड्याप्रकरणी नऊ जणांना अटक

संतोष राठोडनं लावला खाकीला बट्टा, सात कोटींच्या दरोड्याप्रकरणी नऊ जणांना अटक

Subscribe

मुंबईच्या एका पोलीस हवालदारांने घरफोडी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून दोन दिवसात त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे.

‘सद रक्षणाय खल निग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद वाक्य. पण, याच ब्रीद वाक्याला मुंबईतील एका पोलिसांने बट्टा लावला आहे. मुंबईच्या एका पोलीस हवालदारांने घरफोडी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून दोन दिवसात त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कोर्टाने त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या चोरीमध्ये मदत केल्याचा आरोप या पोलीस हवालदारावर आहे.

नेमके काय घडले?

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व कारखाने बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कारखान्यावर पाळत ठेवून पोलीस हवालदार संतोष राठोडने दागिन्याच्या कारखान्यातच चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस हवालदार संतोष राठोड याची एमआयडीसी पोलीस स्टेशनवरून वर्सोवा पोलीस स्टेशन मुंबई येथे एक वर्षापूर्वी बदली झाली होती. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला संतोष राठोड यांनी काम केले होते. त्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील त्याला सर्व माहिती होती. त्यामुळे याचाच फायदा घेत एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमधील एका सोन्याच्या कारखान्यात चोरीचा प्लॅन केला.

- Advertisement -

संतोष राठोड यांनी सहा ते सात लोकांच्या मदतीने एका गाडीच्या साह्याने सदर कारखान्याच्या वरती सिमेंटचे पत्रे काढून आतमध्ये प्रवेश करून ट्रेझरी लोक ग्राइंडर कटरच्या साह्याने कट करून कारखान्यातील सोन्याचे हिरेजडीत दागिने, तसेच हिरे आणि इतर दागिने बनवण्याकरता आवश्यक असलेले सोने असा एकूण ७ कोटी ९ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा ऐवज चोरला आहे. सदरचे दुकानदार सिंधी असून त्यांनी याप्रकरणी २२ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, सदर चोरी किती तारखेला झाले हे पाहण्याकरता पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तपास करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तपासात ६ एप्रिल रोजी लाईट अधिक वापर केल्याने निदर्शनास आले. त्यावरुन ६ एप्रिलला चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

८० लाखाच्या मुद्देमालाची चोरी

सदर घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज घेतले असता एका गाडीचा नंबर ट्रेस झाला. त्या गाडीने बऱ्याच वेळा तिथे चक्रा मारल्याचे दिसून आले. त्यावरून सदर गाडी ट्रेस करत गाडीच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा प्रकार कोणी आणि कसा केला याबाबत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी पोलीस हवालदार संतोष राठोड याचे देखील नाव पुढे आले. दरम्यान, राठोड यांच्यासह गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करून चौकशी केली. मात्र, संतोष राठोड यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यांच्या घराची झडती घेतली असता राठोड यांनी त्यातील ८० लाखाचा मुद्देमाल मित्रांकडे ठेवण्यासाठी दिल्याचे उघडकीस आले. दरम्यान, ७.५ कोटीपैकी पोलिसांनी आतापर्यंत ६ कोटी १७ लाखांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून दोन दिवसात त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

आरोपींची नावं

– विपुल आनंदा चांबरिया (वय 35 वर्षे)

– दिमण छोटलाल चौहान (वय, 32 वर्षे)

– मुन्नाप्रसाद हिरालाल खैरवार (वय 49 वर्षे)

– लक्ष्मण नरसप्पा दंडू उर्फ मच्छी (वय 35 वर्षे)

– शंकर कुमार येशू (वय 42 वर्षे)

– राजेश शैलु मारपक्का (वय 29 वर्षे)

– विकास तुळशीराम चनवादी (वय, 24 वर्षे)

– इरफान लतीफ मुलांनी

– संतोष राठोड, पोलीस शिपाई


हेही वाचा – मुंबईत एकाच दिवशी २७ रुग्णांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -