घरमुंबईउर्मिला मातोंडकरांच्या पक्षबदलाने काँग्रेसचं नुकसान नाही - एकनाथ गायकवाड

उर्मिला मातोंडकरांच्या पक्षबदलाने काँग्रेसचं नुकसान नाही – एकनाथ गायकवाड

Subscribe

‘लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन उचित सन्मान केलेल्या परंतु त्यानंतर काँग्रेस पक्ष वाढीसाठी कोणतेही योगदान नसलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला कोणतेही नुकसान होणार नाही’, अशा शब्दांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. दरम्यान, त्यानंतर काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर कार्यक्षम होताना दिसल्या नाहीत. आता शिवसेनेकडून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे.

३० नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील राजीव गांधी भवन येथे संविधान जागर दिनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानाच्या आधारावरच आज देश चालतो आहे. संविधानानुसार सर्वांना स्वातंत्र्य, समानता, बंधुता देण्याचा संकल्प सर्वांनी करावा तसेच आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा प्रयत्न करावा, असेही यावेळी एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

‘लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो गैर असला तरी काँग्रेस पक्षात असताना काँग्रेस पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. केवळ निवडणुकीपुरत्या त्या काँग्रेस पक्षात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या काँग्रेस सोडण्याने काँग्रेस पक्षाला काही परिणाम होणार नाही’, असे एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -