घरताज्या घडामोडीएकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात लावणार हजेरी

एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात लावणार हजेरी

Subscribe

३० डिसेंबर २०२० रोजी खडसेंना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

पुण्यातील भोसरी जमीन घोट्याळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. ३० डिसेंबर २०२० रोजी खडसेंना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदीसह खडसेंची आणखी इतर प्रकरणाबाबतही चौकशी होणार आहे. ईडीने खडसेंना ३० डिसेंबरला समन्स बजावल्यानंतर ते जळगावहून मुंबईला आले होते. त्याच काळात कोरोनाची लागण झाल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. वैद्यकीय सल्ल्यानुसार खडसेंनी योग्य उपचार घेतले. क्वारंटाईन काळ संपल्यानंतर ते ईडीटच्या चौकशीस हजर राहतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार ते आज सकाळी ११ वाजता मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार आहेत.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा प्रकरण

- Advertisement -

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी एकनाथ खडसेंनी खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. ही जमीन खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावाई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रूपयेही भरण्यात आले. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आल्या असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा वापर करून आपल्या पत्नी आणि जावयाला ही जमीन विकत घेऊन दिल्याचा आरोप खडसे यांच्यावर करण्यात आलेत. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना २०१६ साली त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -