घरमुंबईEknath Shinde : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

मुंबई: मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण बनविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  वर्षा निवासस्थानी बुधवारी मुंबई महापालिकेशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला, राज्याचे बंदरे विकास व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, संचालक (माहिती व तंत्रज्ञान) शरद उघडे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कोळिवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना

मुंबईतील कोळिवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच, मुंबईत सुशोभिकरणाचे १ हजार १५० प्रकल्प सुरू आहेत. त्याचे दृष्यस्वरुपात बदल दिसत आहेत. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण- श्रीकांत शिंदे

मुंबईतील रखडलेल्या कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबत मुंबई महापालिका नव्याने धोरण बनवणार आहे. या पुनर्विकासात एफएसआयचा वापर व डीसीआरबाबतच्या कामाला पालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे कोळीवाडयांचा विकास होऊन कोळीवाड्यातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती शिवसेना ( शिंदे) गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पालिका आयुक्त चहल यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील काही महत्वाच्या समस्या, प्रश्न, विकासकामे आदींबाबत त्यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन चर्चा केली. मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे आहेत. या ठिकाणी राहणारे कोळी बांधव हे मूळ रहिवासी आहेत. त्यांची कुटुंबे वाढत असून त्यांना राहण्यासाठी सध्याच्या घरातील जागा ही अत्यंत अपुरी पडत आहे. घरावर वरचा मजला चढवला तर तो बेकायदेशीर ठरवून महापालिकेकडून त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे कोळीवाड्यांचा पुनर्विकास मार्गी पावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त चहल यांची मंगळवारी भेट घेतली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -