घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदेचे मन वळवण्यासाठी शिवसेनेचे चाणक्य सूरतमध्ये

एकनाथ शिंदेचे मन वळवण्यासाठी शिवसेनेचे चाणक्य सूरतमध्ये

Subscribe

शिवसेना नेत्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सूरतकडे रवाना झाले आहेत.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला असून नाराज झालेल्या शिवसेना नेत्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सूरतकडे रवाना झाले आहेत.

शिंदेची नाराजी मविआला भारी पडली असून सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेना फोन केला होता. त्यावेळी शिंदेनी त्यांना चर्चेची तयारी दाखवली. दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर नार्वेकर आणि ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार तसेच शिंदेंचे विश्वासू रविंद्र फाटक हे सूरतच्या दिशेने तातडीने रवाना झाले आहेत. दुपारी चारच्या सुमारास ते सुरत येथे पोहचण्यची शक्यता आहे. त्यानंतर शिंदेची बाजू ऐकूण घेतल्यानंतर नार्वेकर फोनवरच उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात बोलणे करून देतील असे बोलले जात आहे. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या भेटीकडे लागले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सुरतमधील मेरिडीयन हॉटेलमध्ये २५ पेक्षा जास्त आमदारांसोबत असल्याचे कळते. विधान परिषदेत शिवसेनेची फुटलेली मते आणि एकनाथ शिंदे समर्थक नॉट रिचेबल असल्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -