घरमुंबईसव्वाशे वर्षांची पाठारेंची एकविरा आई

सव्वाशे वर्षांची पाठारेंची एकविरा आई

Subscribe

वसई:-सोपारा गावातील पाठारे यांच्या एकविरा आईच्या स्थापनेला यंदा सव्वाशे वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून पाठारे निवासात एकाच जागी ही देवी विराजमान होत आहे. त्यात कोणताही खंड पडलेला नाही. पाठारेंची पाचवी पिढी या देवीची स्थापना करून सेवा करत आहे.

सव्वाशे वर्षांपूर्वी मोरोबांनी सोपारा-लोहार आळीतील पाठारे निवासात सर्वप्रथम एकविरेची नवरात्रीला स्थापना केली होती. तेव्हापासून एकाच घरात,त्याच ठिकाणी नवरात्रीला देवी विराजमान होत आहे. माणसे, पिढ्या बदलल्या. मात्र, देवीच्या स्थापनेत, जागेत, प्रार्थनेत कोणताही फरक पडलेला नाही. सुरुवातीला काही वर्षे नऊ दिवस देवीला सतत माशांचा तेही खवले असलेल्या माशांचा नैवेद्य दाखवला जात होता. त्यावेळी मोरोबांच्या अंगात देवीचा संचार होत होता. आता त्यात कालानुरुप बदल होऊन दूध, केळीचा नैवेद्य दाखवला जातो. या नऊ दिवसांत बुधवार,शुक्रवार आणि रविवारी मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो.

- Advertisement -

पंचमीला सवाष्णपूजन केले जाते. या दिवशी गावातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ ठेवला जातो. त्यानंतर अष्टमीला होमाचे आयोजन केले जाते. यावेळी लाल कोंबड्याच्या मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचे मांस ग्रामस्थांना प्रसाद म्हणून वाटले जाते, अशी माहिती पाठारे कुटुंबातील जेष्ठ सदस्य शशीनाना पाठारे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -