घरताज्या घडामोडीप्रॉपटीसाठी अल्पवयीन बहिणीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लावलं लग्न

प्रॉपटीसाठी अल्पवयीन बहिणीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लावलं लग्न

Subscribe

प्रॉपटीसाठी सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे एका ५० वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीसह तिचा पती आणि ५० वर्षांच्या नवरदेवाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या तिघांनाही विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक किशोर खरात हे करीत असून त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला.

सोळा वर्षांची ही मुलगी मानखुर्द परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिची मोठी बहिण तिला एका ५० वर्षांच्या व्यक्तीकडे घेऊन आली होती. लग्नासाठी तिचे त्याच्याशी बोलणी सुरु होती. ही व्यक्ती त्याच्या आईसोबत तिथे राहत असून त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. या मुलीशी लग्न झाल्यास त्याची रेल्वेजवळील शेतजमीन आणि झोपडे तिच्या नावाने करुन देण्याचे आश्वासन त्याने पिडीत मुलीच्या बहिणीला दिले होते. लग्नासाठी तिला दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिला तिच्या बहिणीने त्याच्या घरी सोडून दिले.

- Advertisement -

याच दरम्यान या व्यक्तीने पीडित मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर तिने तिच्या आईला सांगितला. तिला ही माहिती ऐकून धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यांत ५० वर्षांच्या या आरोपीसह पीडित मुलीची मोठी बहिण आणि तिचा पती अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. पीडित मुलीची मेडीकल करण्यात आली आहे.

प्रॉपटीसाठी मोठ्या बहिणीसह तिच्या पतीने अल्पवयीन बहिणीला आरोपीच्या घरी आणले आणि तिला तिथेच राहण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर या आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस झाले आहे. याबाबत तपास अधिकारी किशोर खरात यांनी काहीही माहिती देण्यास नकार देताना तपास सुरु असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -